लंडन किड्स शाळेत विद्यार्थ्यांचे स्वागत
विद्यार्थ्यांवर फुलांचा वर्षाव
अहमदनगर (प्रतिनिधी)- केडगाव येथील लंडन किड्स प्री स्कूल येथे चिमुकल्यांचा पहिला दिवस मोठ्या आनंदात पार पडला. उन्हाळी सुट्टयांच्या कालावधीनंतर शाळा सुरु झाली आणि मुलं शाळेत आल्याने काही आनंदी चेहरे तर काही रडणारे चेहरे पहावयास मिळाले.
नवीन प्रवेश घेतलेल्या नर्सरी आणि केजी मधील मुलांवर फुलांची उधळण करून त्यांचे स्वागत करण्यात आले. विविध उपक्रमाने मुलांचे स्वागत करण्यात आल्याने रडणाऱ्या चेहऱ्यावरही हासू उमटले. शाळेच्या प्राचार्या रुचिता जमदाडे म्हणाल्या की, दरवर्षी नवीन मुलांचे थाटात स्वागत करण्यात येते. परंतु यंदाच्या वर्षी जुन्या मुलांनी नवीन मुलांचे फुलांची उधळण करून स्वागत केल्याने सर्व विद्यार्थी व पालकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले.
पालक प्रतिनिधी सुमित लोंढे म्हणाले की, मुलांना विविध उपक्रमातून आनंदी शिक्षण दिले जात आहे. त्याचबरोबर विविध प्रकारचे सण-उत्सव अतिशय मोठ्या प्रमाणात साजरे करुन मुलांमध्ये संस्कार देखील रुजवले जात असल्याचे त्यांनी सांगितले. उपस्थितांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी सर्व शिक्षक, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.