लक्ष्मी पूजनाची तयारी,विधी…..

- Advertisement -

अहमदनगर मीडिया डेलि न्युज – दिवाळीत लक्ष्मीपूजनाची तयारी करत असताना घराच्या मुख्य द्वारासमोर स्वच्छता करून घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर आंब्याची पाने आणि झेंडुची फुले यांचा समावेश असलेले आकर्षक तोरण लावावे.

मुख्य द्वाराच्या समोर सुंदर रंगाची रांगोळी काढून दारात महालक्ष्मीचे पाऊले काढावे.घरात सकारात्मकता येण्यासाठी रांगोळीवर हळद, कुंकू वाहावे..!!

ज्या ठिकाणी लक्ष्मीपूजन करणार आहे त्या ठिकाणची जागा स्वच्छ करावी त्यानंतर एक चौरंग घ्यावा.चौरंगावर लाल रंगाचे वस्त्र घालावे.चौरंगाच्या बाजूला रांगोळी काढावी.

चौरंगावर अक्षतांचे स्वस्तिक काढावे. त्या स्वस्तिकावर एक तांबा ठेवून त्यात पाणी,तांबडी सुपारी, एक रुपाया टाकुन मिसळून त्या कलशात नागीणिचे किंवा आंब्याचे पाच पान घालून त्यावर नारळ ठेवावे.त्या कलक्षाशेजारी देवी लक्ष्मीची मूर्ती ठेवून तीला फुलांचा हार घालावा. यानंतर कलशाच्या उजव्या बाजूला गणेशाची स्थापना करावी.

सोबतच पाच प्रकारची फळे, लाह्या बताशे केरसुणी यांचे पुजन करावे.लक्ष्मी देवीजवळ व्यापार व्यवसाया संबंधित असलेली काही पुस्तके किंवा डायरी त्यांची नवीन कॉपी देखील ठेवावी.

याच बरोबर घरातील पैसे आणि सोने यांना हळदी कुंकू व धने वाहून पुजन करावे.या पुजे समोर सुंदर रांगोळी काढून समई पेटवून धुप अगरबत्ती लावावी लक्ष्मी मंत्र किंवा ‘ऊँ महालक्ष्मयै नम:’ मंत्र उच्चारून स्थापन केलेल्या देवतांची पंचामृतासह षोडशोपचार पूजा करावी.

महालक्ष्मी देवीला अनारसे, इतर फराळ व पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून देवीची आरती करावी.देवीला सुख,शांती, भरभराट,ऐश्वर्य आणि समृद्धी यांचा प्राप्तीसाठी प्रार्थना करावी.त्यानंतर घरातील वडीलधारी मंडळीचे आशिर्वाद घ्यावे.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles