लाट परिवर्तनाची ! निलेश लंके यांचा विजय पक्का!
विखे पाटलांची सरंजामशाही संपणार, ओपिनियन पोल चे निष्कर्ष
अहिल्यानगर : बहुतेक सर्व वाहिन्या आणि संस्थांच्या सर्वेमध्ये नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके निवडणूक जिंकतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. हे एकप्रकारचे सुचिन्ह असून नगर दक्षिण मतदारसंघाला विखे पाटील घराण्याच्या सरंजामशाहीतून मुक्ती मिळेल अशी आशा सर्वसामान्य नागरीक व्यक्त करीत आहेत.
महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांनी एक एप्रिलपासून मतदारसंघात नगर दक्षिण स्वाभिमान यात्रा सुरू केली असून या माध्यमातून ते मतदारांशी संवाद साधत आहेत. त्यांच्या यात्रेला भरघोस प्रतिसाद मिळत आहे. अगदी विरोधी गटातील अनेक मातब्बर मंडळींनी तुतारी हाती घेऊन लंके यांचे हात बळकट केले आहेत. वृत्तवाहिन्यांच्या सर्वेनुसार अहमदनगर लोकसभा मतदारसंघात निलेश लंके सुजय विखे यांचा पराभव करतील अशी शक्यता वर्तवली आहे.
गेली अनेक वर्षांपासून विखे पाटील घराण्याने गर जिल्ह्यावर निर्विवाद वर्चस्व गाजविले आहे. स्वतः बाळासाहेब विखे पाटील हे अनेक वर्षे खासदार होते. याखेरीज त्यांनी केंद्रीय मंत्रीपद देखील भुषविले आहे. स्वतः राधाकृष्ण विखे पाटील हे अनेक वर्षांपासून आमदार असून ते विद्यमान सरकारमध्ये महसूलमंत्री आहेत. विखे पाटील घराणे हे राज्यात आणि केंद्रात ज्याची सत्ता असते त्याची तळी उचलण्याबाबत प्रसिद्ध आहेत. जनता त्यांच्या या पलटीमार धोरणाला कंटाळली आहे. याशिवाय या पलट्या मारताना मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार होत असून विकासाच्या नावावर जिल्ह्यामध्ये काहीही भरीव होताना दिसत नाही. यामुळेच यंदाची निवडणूक जनतेने हाती घेतली असून सर्वसामान्य जनता विरुद्ध राजपुत्र असा संघर्ष होताना दिसत आहे. यामध्ये जनता विजयी होण्याची चिन्हे असून राजपुत्राला घरी बसावे लागणार अशी चिन्हे आहेत.
- Advertisement -