लॉकडाऊन नंतर साईबन लागले फुलायला,पूर्ण परिसर झाला हिरवागार  

- Advertisement -

अहमदनगर प्रतिनिधी – महेश कांबळे

कोविडमुळे गेली अनेक महिने बंद असलेल्या पर्यटन केंद्राला शासनाने परवानगी दिल्यानंतर नगरमधील एमआयडीसीच्या मागे असणार्या साईबन कृषी पर्यटन केंद्रात सध्या रोज पर्यटक येण्यास सुरु झाले असून पावसाने येथील बंधार्यात चांगले पाणी आहे व परिसर पूर्ण हिरवागार झाला असून जणू हिरवा शालू च पांघरला आहे असे लांबून वाटते,अनेक महिने बाहेर न पडल्याने सध्या पर्यटकाचे साईबन हे आकर्षण बनले आहे सध्या येथील बंधारा पाण्याने ओसुडून वाहत आहे तर परिसर दूरपर्यंत सुंदर दिसत आहे .

नगरचे प्रसिद्ध नेत्रतज्ज्ञ डॉ. प्रकाश व डॉ. सुधा कांकरिया यांनी २७ वर्षांपूर्वी नगर-शिर्डी रस्त्यावर औद्योगिक वसाहतीच्या पाठीमागे १५० एकरांच्या माळरानावर हिरव्यागार वनराईचे स्वप्न पाहिले आणि ते साकारण्यास सुरूवात केली.याकरिता त्यांनी अण्णा हजारे, मोहन धारिया यांचे मार्गदर्शन घेतले.पडिक व ओसाड माळरानावर डॉ.कांकरिया यांनी आंबा,चिंच,कडुनिंब, निलगिरी,बाभूळ, साग,बांबू,बोर,आवळा,सीताफळ,करवंद अशा झाडांची लागवड केली. औद्योगिक प्रकल्पाचे वाया जाणारे सांडपाणी मोठ्या कुशलतेने ठिबक सिंचनाचा वापर करून झाडांना दिले आणि पडणाऱ्या पावसाचा प्रत्येक थेंब अडविला.

सेंद्रिय शेतीचा प्रयोग डॉ. कांकरिया यांनी गांडूळखत प्रकल्पही उभारला.जमिनीचा पोत सुधारावा म्हणून पालापाचोळा,तसेच सेंद्रिय खत वापरले जाते. सेंद्रीय शेती करण्याचा सल्ला ते शेतकऱ्यांना देतात.डॉ. कांकरिया यांनी नवीन तंत्रज्ञान वापरून पॉलिहाउस विकसित केली आहे.यात फूलशेती, कार्नेशन,ऑर्किड, जरबेरा,अँथुरियम व फळशेतीचा समावेश असून,लाल व पिवळी सिमला मिरची, काकडी लोकप्रिय झाली आहे.लोकांचे प्रबोधन व्हावे,त्यांनी या उद्यानातून प्रेरणा घ्यावी यासाठी त्यांनी मागील दहा वर्षांपासून कृषी पर्यटन केंद्र  बनले आहे व विकास केला आहे.

साईबन कृषी पर्यटन केंद्रामध्ये अंतराळ सफर,सी वर्ल्ड,आयुर्वेदिय उद्यान,रोपवाटिका,पाणी अडवा,पाणी जिरवा मॉडेल व प्रदर्शनी,नक्षत्र उद्यान,भारतातील अभयारण्यांची माहिती/अपारंपारिक ऊर्जा,वाइल्ड लाइफ फोटोचे प्रदर्शन,जगातील नवीन-जुनी सात आश्­चर्ये आदी दालने विकसित केली असून पर्यटकांसाठी तलाव,बोटिंग,घसरगुंड्या,झोके,पपेट-शो अशा बऱ्याच गोष्टी विरंगुळा म्हणून उपलब्ध आहेत.सहकुटुंब एक अख्खा दिवस निसर्गाच्या सानिध्यात घालवावा असे हे ठिकाण आहे.

महाराष्ट्र शासनाने वनश्री पुरस्कार देऊन डॉ. कांकरिया दाम्त्याच्या या उपक्रमास सन्मानित केले असून,केंद्र सरकारने व इतर बऱ्याच सामाजिक संस्थांनी राष्ट्रीय पातळीवर सन्मान केला आहे.आलेल्या पर्यटकांसाठी मानसिक ताणतणाव कमी करण्यासाठी मोफत ध्यानमंदिर व मेडिटेशन टेकडीही या प्रकल्पात उभारण्यात आली आहे.तसेच मार्ट या संस्थेतर्फे आदर्श कृषी पर्यटन केंद्र पुरस्कारही मिळाला आहे.जैनांचे आचार्य शिवमुनीजी व त्यांच्या समवेत ऋषी प्रभाकर हे एक महिना साईबनमध्ये वास्तव्यास होते.महाराष्ट्र सरकार कृषी पर्यटन केंद्रची संकल्पना पुढे आणत आहे.यामुळे शेतकऱ्यांना पर्यटकांद्वारे एक जोडधंदा मिळेल.त्याप्रमाणे शहरी लोकांना ग्रामीण व शेतीची माहिती मिळेल असा दृष्टिकोन स्वीकारला जात आहे. मात्र, साईबन काळाची गरज आधीच ओळखली व आदर्श निर्माण केला आहे.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles