वसई प्रतिनिधी – मच्छिंद्र चव्हाण
वसई न्यायालयात दिनांक २५ सप्टेंबर २०२१ रोजी सकाळी १०.३० वाजता राष्ट्रीय लोक न्यायालयाचे आयोजन करण्यात आले आहे.
लोकन्यायालयामध्ये वसई विरार क्षेत्रामध्ये वाहतूक नियमांचे उल्लंघन केले म्हणून वाहतुक पोलीसांनी ऑनलाईन पद्धतीने आकारलेल्या ई-चलनाचे दावे आता लोकअदालतीत निकाली काढण्यात येणार आहे.
ही प्रकरणे निकाली काढण्यासाठी वाहतुक पोलीसांनी वाहन चालकांना कोर्टाची लोकअदालतीची नोटीस एसएमएम द्वारे पाठविण्यात आलेली असून अश्या प्रकारची नोटीस मिळालेल्या वाहन चालकांनी जवळचे वाहतुक शाखा , पोलीस ठाणे अंमलदार, तालुका विधी सेवा समिती, वसई यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा किंवा वाहनचालकांनी ऑनलाईन पद्धतीचा वापर करून ई-चलनाची रक्कम ऑनलाईन पद्धतीने भरावी असे आवाहन सुधीर एम. देशपांडे, जिल्हा न्यायाधीश-1,वसई, आर. एच. नाथाणी, सह दिवाणी न्यायाधीश ब स्तर, वसई, एस.बी.पवार, दिवाणी न्यायाधीश क स्तर, वसई व वाहतुक पोलीस निरीक्षक, वसई शाखा शेखर डोंबे यांनी केले आहे.