कर्जत प्रतिनिधी – गणेश जेवरे
कर्जत नगरपंचायत निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडी च्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती व बैठक कर्जतमध्ये तालुका अध्यक्ष सोमनाथ भैलुमे यांच्या अध्यक्षतेखाली झाली.
यावेळी पक्ष निरीक्षक अँड अरविंद तायडे यांनी पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना कर्जत नगरपंचायत निवडणूक बाबत विशेष मार्गदर्शन करत असताना सांगितले की कर्जत नगरपंचायत निवडणूक वंचित बहुजन आघाडी सर्व १७ जागा लढवणार आहे.
मात्र धनशक्ती व जातीयवादी पक्षांचा पराभव करण्यासाठी समविचारी पक्ष,संघटना यांना बरोबर घेवून वंचित बहुजन आघाडी,युती करायला तयार आहे असे यावेळी बोलताना सांगितले.
यावेळी राज्य समन्वय अँड अरुण जाधव.जिल्हा संघटक नंदकुमार गाडे,प्रा विक्रम कांबळे,अनिल समुद्र,गोदड समुद्र,रंगीशा काळे जोती भोसले,अशा अनेक मान्यवर उपस्थित उमेदवारांनी आपले मनोगत यावेळी व्यक्त केले.
या वेळीं सर्व सतरा प्रभागात सतरा लोकांमध्ये नियोजन कमिटी करण्यात आली आहे.पक्ष निरीक्षक अँड अरविंद तायडे,जिल्हा अध्यक्ष प्रतिक बारसे,राज्य समन्वय अँड अरुण जाधव,जिल्हा महासचिव योगेश साठे,यांनी यावेळी उपस्थित इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या.
यासह जिल्हा सल्लागार चंद्रकांत डोलारे, जिल्हा संघटक नंदकुमार गाडे, जिल्हा सचिव चंद्रकांत नेटके, जिल्हा सल्लागार जीवन पारधे,जिल्हा उपाध्यक्ष संतोष गलांडे सुरेश कोंडलकर,युवा आघाडी जिल्हा अध्यक्ष संतोष जठार,जिल्हा युवा आघाडी संघठक मयुर ओव्हळ,सर्व जिल्हा पदाधिकारी उपस्थित होते.
तसेच तालुका उपाध्यक्ष संजय शेलार,तालुका संघटक रमेश शेलार,तालुका सल्लागार कमिटीतील हानूमंत साळवे आणि अनिल समुद्र,पोपट शेटे,बाप्पु जावळे, तालुका सचिव तुकाराम पवार, कुलदीप शेलार,दत्ता खुडे, दादा उकीरडे यांच्या सह अनेक तालुका पदाधिकारी आणि कर्जत शहरातील महादेव भैलुमे गोदड समुद्र प्रा. विक्रम कांबळे,प्रा.दादा समुद्र, माजी पोलीस निरीक्षक मिलिंद ठोसर,सुनिता काळे,अनिल समुद्र,दिपक काळे,तुकाराम पवार,अतुल आखाडे,काजोरी पवार,रंगीशा काळे,राहुल पोळ,प्रदीप समुद्र,बापू भवर,दिपक भैलुमे,अनिल गोरे,दादा पोपट साळवे,जोती भोसले,महावीर सोनवणे,दादा धावडे,नुरा भोसले त्रिशाली काळे,निर्मला भैलुमे,कायदेशीर पवार, गणेश काळे,सचिन काळे, मोहन चव्हाण,सर्वेनाथ काळे, यांच्या सह कर्जत शहरातील अनेक पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी सुत्रसंचलन प्रा.दादा समुद्र यांनी केले तर प्रस्ताविक प्रा.विक्रम कांबळे यांनी केले आणि महादेव भैलुमे यांनी उपस्थित सर्वांचे विशेष आभार मानले.