वारकरी संप्रदायातील खुडे महाराज व जाधव महाराज यांना पुरस्कार जाहीर

- Advertisement -

वारकरी संप्रदायातील खुडे महाराज व जाधव महाराज यांना पुरस्कार जाहीर

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जीवनसाधना पुरस्काराने होणार सन्मान

अहमदनगर (प्रतिनिधी) – वारकरी संप्रदायात उल्लेखनीय कार्य करणारे ह.भ.प. संतोष खुडे महाराज व ह.भ.प. एकनाथ जाधव महाराज यांना स्व.पै. किसनराव डोंगरे बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जीवनसाधना पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

निमगाव वाघा (ता. नगर) येथे छत्रपती संभाजी महाराज, पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त रविवार दि.9 जून रोजी निमगाव वाघा येथील परिवार मंगल कार्यालयात राज्यस्तरीय पाचव्या काव्य संमेलनचे आयोजन करण्यात आले आहे. या काव्य संमेलनात पाहुण्यांच्या हस्ते खुडे व जाधव महाराज यांना पुरस्काराने सन्मानित केले जाणार असल्याची माहिती काव्य संमेलनाचे आयोजक तथा डोंगरे संस्थेचे अध्यक्ष पै. नाना डोंगरे व सचिव मंदाताई डोंगरे यांनी दिली.

बेनवडी (ता. कर्जत) येथील ह.भ.प. संतोष खुडे महाराज व टाकळी खातगाव (ता. नगर) येथील ह.भ.प. एकनाथ जाधव महाराज अनेक वर्षापासून वारकरी संप्रदायात सेवा देत आहेत. विविध धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्यात त्यांचे निस्वार्थपणे योगदान सुरु आहे. या कार्याची दखल घेऊन त्यांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जीवनसाधना पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles