वाराणसी येथील विकासकामांचे १३ रोजी लोकार्पण

- Advertisement -

भाजपातर्फे देशभरासह नगरमध्येही विविध कार्यक्रम – भैय्या गंधे

अहमदनगर प्रतिनिधी – वाराणसी तथा काशी येथील विकास प्रकल्पांचे (वाराणसी कॉरिडॉर) लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १३ डिसेंबर रोजी होणार आहे.या कार्यक्रमाचे औचित्य साधत भारतीय जनता पार्टीच्यावतीने देशभर‘ दिव्य काशी,भव्य काशी’ या उपक्रमाचे आयोजन केले जाणार आहे.

महाराष्ट्रात चार ज्योर्तिलिंगांच्या स्थळांसह सुमारे २१०० ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.देशभरात सुमारे ५१ हजार ठिकाणी’ दिव्य काशी-भव्य काशी’ या कार्यक्रमाचे भव्य पडद्यावरून थेट प्रक्षेपण केले जाणार आहे.

संपूर्ण देशभर १०,११ व १२ डिसेंबर रोजी सर्व मंदिराच्या तसेच मठ,आश्रमात,अन्य धार्मिक ठिकाणी स्वच्छता अभियानाचे आयोजन केले जाणार आहे.तसेच कार्यक्रमांतर्गत स्थानिक धर्माचार्य,साधू संतांचा गौरव केला जाईल.

नगरमध्येही या कार्यक्रमाच्या अनुषंगाने नियोजन सुरु असल्याची माहिती नगर शहर जिल्हाध्यक्ष भैय्या गंधे यांनी दिली.

राज्यात विविध ठिकाणी होणार्‍या कार्यक्रमांमध्ये प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील,माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यासह पक्षाचे सर्व वरिष्ठ पदाधिकारी,लोकप्रतिनिधी सहभागी होणार आहेत.

बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या काशीच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच सौंदर्यी करणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या ७ वर्षांत अनेक योजना प्रत्यक्षात आणल्या आहेत.या योजनांचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १३ डिसेंबर रोजी होणार आहे.

या कार्यक्रमात देशभरातील धर्माचार्य,साधू संत,विद्वान-विचारवंत तसेच उत्तर प्रदेश सह अनेक राज्यांचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सहभागी होणार आहेत.

भारतीय संस्कृतीचे वैशिष्ट्य असलेल्या सामाजिक समरसता,एकता आणि अखंडता यांचे अनोखे दर्शन या कार्यक्रमातून घडेल.राज्यातील ५० साधू, संत या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.

या निमित्ताने भारतीय जनता पार्टीने राष्ट्रीय पातळीवर अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.१३ डिसेंबर पासून सुरू होणारे हे कार्यक्रम मकर संक्रांतीपर्यंत म्हणजे १४ जानेवारी २०२२ पर्यंत चालतील,असेही श्री.गंधे यांनी सांगितले.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles