वारुळाचा मारुती रोड येथे अरुणोदय गोशाळा जागेची केली पाहणी
गो शाळेच्या माध्यमातून आपली परंपरा व संस्कृती जोपासली जाते – आ. संग्राम जगताप
नगर : अरुणोदय गोशाळेच्या माध्यमातून गेल्या तेरा वर्षांपासून गाईंचा सांभाळ करण्यात येत आहे, नगरकरांच्या आशीर्वादामुळे गोशाळा सुरू असून सुमारे 500 गाया या ठिकाणी आहेत हिंदू धर्मामध्ये गाईंना महत्त्वाचे स्थान आहे दिवाळी या सणाची सुरुवात वसुबारस पासून होत असून त्या दिवशी आपण सर्वजण गाईंची पूजा करत असतो लवकरच अरुणोदय गोशाळा वारुळाचा मारुती या परिसरात स्थलांतरित होणार असून या कामाच्या जागेची पाहणी करण्यात आली असून त्याच्या कामाला देखील सुरुवात झाली आहे,गो शाळेच्या माध्यमातून आपली परंपरा व संस्कृती जोपासली जात असून शहराच्या वैभवात भर पडणार आहे असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले वारुळाचा मारुती रोड येथे अरुणोदय गोशाळा जागेची पाहणी आमदार संग्राम जगताप यांनी केली यावेळी सुमतीलाल कोठारी, सीए अशोक पितळे, प्रा. माणिकराव विधाते, अनुप काळे, इंजि. प्रितेश कांकरिया, राम वाघ, सुनील भोसले, मनिष फुलडहाळे आदी उपस्थित होते.
चौकट : शहर विकासाच्या कामाबरोबरच आध्यात्मिक, धार्मिक ,सामाजिक ,सांस्कृतिक ठेवा जोपासला गेला पाहिजे, संत महंतांच्या विचाराची देवाण-घेवाण होणे गरजेचे आहे, शहरातील नागरिकांना शांत प्रसन्न वाटावे, यासाठी वारुळाचा मारुती परिसरात अरुणोदय गोशाळेची निर्मिती होत असून लवकरच काम पूर्ण होणार आहे, गाईंचे महत्त्व समाजाला पटावे यासाठी आमचे काम सुरू आहे सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू असून दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात अरुणोदय गोशाळा येथे गाईंना घेऊन येत असून त्याचा संभाळ या ठिकाणी केला जात असल्याचे मत आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केले.