- Advertisement -
वाळूंजच्या सरपंचपदी पार्वतीताई हिंगे बिनविरोध दुसऱ्यांदा मिळाली सरपंच पदाची संधी; गावात एकच जल्लोष
अहमदनगर (प्रतिनिधी)- वाळूंज (ता. नगर) ग्रामपंचायतच्या सरपंचपदी पार्वतीताई गोरखनाथ हिंगे यांची दुसऱ्यांदा बिनविरोध निवड झाली. गुरुवारी (दि.18 एप्रिल) वाळूंज ग्रामपंचायत कार्यालयात निवडणुक प्रक्रिया पार पडली. हिंगे यांची सरपंच पदासाठी निवड झाल्यानंतर जल्लोष करुन त्यांचा सत्कार करण्यात आला. यापूर्वी त्या 2005 ते 2010 या काळात सरपंच होत्या.
मावळते सरपंच विजय शेळमकर यांनी राजीनामा देऊन पार्वतीताई हिंगे यांचे नाव सरपंच पदासाठी सुचविले होते. गावाचे रिक्त असलेल्या सरपंच पदासाठी निवड प्रक्रिया गुरुवारी पार पडली. सरपंच पदासाठी पार्वतीताई हिंगे यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांच्या अर्जाची छाननी करुन सरपंच पदासाठी त्यांची निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून वैशाली साळवे यांनी काम पाहिले. त्यांना तलाठी सुरेखा आबुज, ग्रामसेविका सरिता पवार यांनी सहकार्य केले.
सरपंचपदी निवड झाल्याबद्दल पार्वतीताई हिंगे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी माजी सरपंच महादेव शेळमकर, विजय शेळमकर, उपसरपंच अलका बाळासाहेब दरेकर, ग्रामपंचायत सदस्य अनिल मोरे, नलिनी पाडळे, सुमित रोहोकले, कविता गायकवाड, चेअरमन रमाकांत शिंदे, व्हाईस चेअरमन भाऊ जाधव, वाळुंज माता ट्रस्टचे अध्यक्ष सुरेश शिंदे, मुख्याध्यापक भाऊसाहेब रोहोकले, हनुमंत काकडे, संजय दरेकर, मच्छिंद्र दरेकर, राजू कर्डिले, कुंदन शिंदे, अविनाश शिंदे, मच्छिंद्र हिंगे, सविता हिंगे, कुंडलिक दरेकर, गोरख दरेकर, रोहिदास पाडळे, अमोल गायकवाड, कैलास राऊत, मयूर दरेकर आदी उपस्थित होते.
गावच्या सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक कार्यात हिंगे परिवार कार्यरत आहे. गोरक्षनाथ हिंगे गावातील हायस्कूलच्या श्री स्वामी विवेकानंद ग्रामविकास संस्थेचे उपाध्यक्ष आहेत. तर मकरंद हिंगे श्री वाळुंज माता देवस्थान सार्वजनिक ट्रस्टचे संचालक असून, महेंद्र हिंगे जुनी पेन्शन कोअर कमिटीचे राज्य सचिव व जिल्हा माध्यमिक शिक्षक सोसायटीचे संचालक आहेत. हिंगे परिवाराने गेल्यावर्षी अडीच लाख रुपये खर्च करून गावच्या श्रीराम मंदिरात राधाकृष्ण मूर्तीची स्थापना केली. श्रीक्षेत्र पंढरपूर येथील वाळूंजच्या वारकरी निवासासाठी 1 लाख रुपये देणगी दिली आहे. सामाजिक, धार्मिक व सांस्कृतिक क्षेत्रात हिंगे परिवार योगदान देत आहे.
- Advertisement -