वास्तविक जीवन संघर्षातून समाज उभा करण्याचे महान कार्य ज्योतिबांनी केले – योगेश साठे
नगर – बहुजन समाजाचे दु:ख, कष्ट, वेदना, हालाखीचा संघर्ष प्रत्यक्षात त्यांनी पाहिला. जनसामान्यांच्या स्वाभिमानाची जपवणूक करण्यासाठी स्वत:चे आयुष्य पणाला लावले. वास्तविक जीवन संघर्षातून समाज उभा करण्याचे महान कार्य ज्योतिबांनी केले म्हणून ते महात्मा झाले. शैक्षणिक, सामाजिक कार्याचा विडा उचलला. म्हणून अशा या क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचे विचार अनमोल प्रेरणादायी आहेत ते प्रत्यक्षात कृतीत आणण्याची खरी गरज असल्याचे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव योगेश साठे यांनी केले.
सावेडी उपनगरात गुलमोहोर पोलिस चौकीजवळ वंचित बहुजन आघाडीच्यावतीने क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंतीनिमित्त त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी योगेश साठे, अॅतड. लक्ष्मीकांत पठारे, शिरिष जानवे, प्रशांत शिंदे, प्रा.अतुल चौरपगार, दिलीप साळवे, स्वप्नील वैद्य, विश्वास नवले, सोपान शेळके, कारभारी कराळे, नानू दासी तसेच बारा बलुतेदार महासंघाचे माऊली गायकवाड, शाम औटी, सुरेश चुटके, दिलीप काकडे, शैलेश धोकटे, एकविरा चौक मालवाहतूक संघटनेचे देवीदास भालेराव, संतोष पवार, किरण चव्हाण, सचिन पवार, सचिन हांडे, पप्पू तागड, माऊली दळवी आदि उपस्थित होते.
पुढे बोलतांना योगेश साठे म्हणाले, महात्मा फुले यांच्या प्रबोधनवादी चळवळीमुळे शिक्षणाची गंगा घरोघरी पोहचली, बहुजन समाजाला रोजगार व निवारा मिळाला, शेतकर्यांवरील अन्याय दूर करीत गुलामगिरी विरुद्ध लढा दिला. अशा या महान कार्यांमुळे त्यांना महात्मा म्हणत. यावेळी बारा बलुतेदार महासंघ, एकविरा चौक, मालवाहतुक संघटनेच्यावतीने पदाधिकार्यांनी आपली मनोगते व्यक्त केली.
- Advertisement -