शेवगांव प्रतिनिधी – वाघोली गावाचा सर्वागीण विकासासाठी गावचे युवा नेतृत्व उमेश भालसिंग यांचे काम कौतुकास्पद असुन विकासाभिमुख काम करण्यासाठी तरूणांचे संघटन महत्वाचे असल्याचे प्रतिपादन आमदार मोनिकाताई राजळे यांनी बोलताना व्यक्त केले.
वाघोली ता शेवगांव येथे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा व समर्पण अभियान अंतर्गत भव्य रक्तदान शिबिर व ५ लक्ष रुपयांच्या खुल्या व्यायामशाळेचे उद्घाटन कार्यक्रम शेवगाव पाथर्डी मतदार संघाच्या आमदार मोनिकाताई राजळे व भारतीय जनता युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष योगेश मैद यांच्या शुभहस्ते पार पडला, त्यावेळी आमदार राजळे बोलत होत्या.
आमदार राजळे पुढे बोलताना म्हणाल्या की वाघोली गावात झालेल्या जलसंधारण,बिहार पॅटर्न वृक्षलागवड व बायोगॅस उपक्रम निश्चित लाभदायी असुन उमेश भालसिंग व युवा मोर्चाला सदैव मार्गदर्शन करण्याची ग्वाही राजळे यांनी दिली.
प्रदेश उपाध्यक्ष योगेश मैद म्हणाले की उमेश भालसिंग व युवा मोर्चाने केलेल्या उत्स्फूर्त कामाची निश्चित दाखल घेतली जाईल व त्यांच्या विधायक कार्यात प्रदेश कार्यकारणी सदैव सोबत असेल अशी ग्वाही दिली.
या कार्यक्रमासाठी यावेळी भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष उमेश भालसिंग,राहुल बंब,महादेव पाटेकर,साईनाथ पाडले,गणेश कराड,जिल्हा सचिव शुभम मोटे,पाथर्डी तालुकाध्यक्ष सचिन वायकर,अमोल गर्जे,मछिंद्र बर्वे,मालन सर,सोमनाथ कळमकर,शुभम मोटे,राहुल बंब ,संदीप खरड, वाघोली चे सरपंच बाबासाहेब गाडगे ,ढोरजळगांंवने चे सरपंच अनंता उकिर्डे,आखतवाडेचे उपसरपंच ज्ञानेश्वर उगले सामनगावचे सरपंच संजय खरड,हिंगनगाव चे सरपंच महादेव पवार,आंतरवालीचे सरपंच गणेश कापसे,ठाकूर निमगावचे सरपंच संभाजी कातकडे ,पोपटराव वाघमोड,पराजी दिंडे,मिताजी वाघमोडे,महादेव तुतारे,विनोद निकम,रामेश्वर नवल,आरेकर विठ्ठल,शेषराव बडे,आव्हाड मारोती व वाघोली ग्रामस्थ व पंचक्रोशीतील तरुण युवक मोठया प्रमाणात उपस्थित होते.
वाघोली गावातील लाभार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते रेशन कार्ड वाटप तसेच रा.स्व.संघ जनकल्याण ब्लड बँक व अर्पण ब्लड बँक आयोजित भव्य रक्तदान सोहळ्यात ८० बॅग रक्तसंकलन करण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दादासाहेब जगदाळे यांनी केले तर आभार नारायण काळे यांनी मानलेे.