विखे यांचे इंग्लिश व हिंदी मधील भाषणाचे चॅलेंज स्वीकारून त्यांना उमेदवारी अर्ज भरण्यापासून रोखले असते- मंगल भुजबळ.
अहमदनगर (प्रतिनिधी)- महायुतीचे लोकसभा उमेदवार डॉ. सुजय विखे यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांना इंग्लिश व हिंदी मधून सुजय विखे यांनी संसदेत केलेले भाषण तोंडपाठ करून बोलून दाखवावे असे चॅलेंज देऊन सदरील चॅलेंज लोकसभेचा फॉर्म भरण्याच्या मुदतीपर्यंत पूर्ण करावे व हे चॅलेंज लंके यांनी पूर्ण केल्यास सुजय विखे हे लोकसभेचा उमेदवारी अर्ज दाखल करणार नाहीत या सुजय विखे यांच्या वक्तव्यावर काँग्रेसच्या राष्ट्रीय समन्वयक मंगल भुजबळ यांनी त्यांचे हे चॅलेंज स्वीकारलं आहे, त्यांनी म्हटले आहे की जर नगर दक्षिणची जागा महाविकास आघाडीत काँग्रेसला मिळाली असती तर काँग्रेसकडून माझी लोकसभेची उमेदवारी फिक्स होती पण ही जागा पुन्हा राष्ट्रवादीलाच मिळाल्याने मी लोकसभेच्या उमेदवारीपासून वंचित राहिले आहे.
जर ही जागा काँग्रेसला मिळाली असती तर सुजय विखे यांचे संसदेतील इंग्लिश व हिंदी मधील भाषणाचे चॅलेंज आपण एक मिनिटात स्वीकारले असते व त्यांचे चॅलेंज स्वीकारल्यावर मी २४ तासाच्या आत त्यांचे संसदेतील भाषण तोंडपाठ करून इंग्लिश व हिंदी मध्ये त्यांच्या पेक्षा जास्त प्रभावीपणे मी बोलून दाखवले असते. कारण मी शिक्षणाने मास्टर ग्रॅज्युएट असून वक्तृत्वाचा पिंड माझ्या रक्तातच आहे.
त्यामुळे सुजय विखे यांनी दिलेले चॅलेंज मी पूर्ण करून दाखवलेचं असते व त्यांना उमेदवारी अर्ज भरण्यापासून नक्कीच रोखले असते जेणेकरून अहमदनगर लोकसभा हा ४६ वर्ष काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता त्याच काँग्रेसला पुन्हा एकदा २०२४ च्या लोकसभेला जिल्ह्यात नवसंजीवनी मिळाली असती परंतु सध्या ही जागा काँग्रेसला नसल्याने व मी महाविकास आघाडीची उमेदवार नसल्याने डॉ. सुजय विखे यांनी त्यांचे संसदेतील इंग्लिश व हिंदी मधील भाषणाच्या दिलेल्या चॅलेंजची संधी महाविकास आघाडीच्या उमेदवाराने गमावल्याचे व त्यांना उमेदवारी अर्ज भरण्यापासून रोखू न शकल्याचे दुःख असल्याचे त्यांनी म्हटले आहे..