कर्जत प्रतिनिधी – गणेश जेवरे
व्यापाऱ्याची दहा लाख रुपयेची बॅग हिसकावून पळवून नेलेल्या आरोपींना तात्काळ अटक करावी.अशी मागणी कर्जत व्यापारी असोसिएशन यांनी केली असून तसे निवेदन सर्व व्यापारी बांधवांनी, उपविभागीय पोलिस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांना दिले.
यावेळी संघटनेचे अध्यक्ष अर्जुन भोज,सचिव बिभीषण खोसे,शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख दीपक शहाणे, शिवसेनेचे व्यापारी आघाडीचे अध्यक्ष महावीर शेठ बोरा, अतुल कुलथे,सचिन कुलथे, प्रफुल्ल नेवसे,संजय काकडे, एडवोकेट कोठारी,प्रसाद शहा,महेश जेवरे,जकी सय्यद व प्रतिष्ठित आडत व्यापारी रवींद्र कोठारी यांच्यासह मोठ्या संख्येने व्यापारी उपस्थित होते.
कर्जत येथील प्रतिष्ठित आडत व्यापारी रवींद्र कोठारी यांचा मुलगा बँकेमधून दहा लाख रुपये काढून घेऊन मार्केट यार्ड कडे येत असताना सोमनाथ विठ्ठल साळुंके,प्रमोद विजय आतार,दोघे राहणार कोरेगाव यांनी बॅग हिसकावून घेऊन पळून गेले होते.याप्रकरणी कर्जत पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
व्यापाऱ्याची पैशाची बॅग पळवून घेऊन जाणारे आरोपी हे कर्जत जवळ असणाऱ्या कोरेगाव या गावांमधील असून देखील त्यांना अद्याप अटक करण्यात आलेली नाही.अशा प्रकारच्या घटना कर्जत तालुक्यात घडत असतील तर ते व्यापाऱ्यांच्या व नागरिकांच्या दृष्टीने अत्यंत घातक असून, यामुळे व्यापारी वर्ग भयभीत झाला आहे.तरी या गुन्ह्याचा तपास तातडीने लावून आरोपींना अटक करावी अशी मागणी व्यापारी बांधवांनी उपविभागीय पोलिस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांच्याकडे केली आहे.
यावेळी श्री जाधव यांनी देखील व्यापारी बांधवांना पोलिस पथके सर्वत्र पाठविण्यात आली असून आरोपींच्या मागावर आहोत.आम्ही आरोपींच्या अगदी जवळ पोचलो आहोत त्यांना लवकरच अटक करण्यात येईल असे आश्वासन यावेळी देण्यात आले.