अहमदनगर (प्रतिनिधी)-
अहमदनगर शहरात युवकांना संघटित करुन पक्ष वाढविण्याचे काम उत्तमपणे सुरु आहे. अहमदनगर शहर रामदास आठवले यांचा बालेकिल्ला असून, आरपीआय जोमाने वाढत आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतील पक्ष म्हणून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया त्यांच्या ध्येय, धोरणानूसार केंद्रीय मंत्री ना. रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली कार्य करीत आहे. सर्व समाजाला बरोबर घेऊन पक्षाचे कार्य सुरु आहे. या कार्याने प्रेरित होऊन शहरातील मोठ्या संख्येने युवकांनी आरपीआयमध्ये प्रवेश केला यावेळी उत्तर महाराष्ट्र सचिव अजय साळवे, जिल्हा उपाध्यक्ष विजय भांबळ, सुरेश वाकचौरे, रमेश भिंगारदिवे, सुनील भाकरे, सदाशिव भिंगारदिवे, चंद्रकांत भिंगारदिवे, विनोद भिंगारदिवे यांच्या उपस्थितीत प्रवेश करताना निखिल साळवे, शपिक मोगल, जावेद पटेल, सचिन भिंगारदिवे, सचिन ससाने, अजय शिंदे, आजिनाथ आळकुटे, अशपाक पठाण, अमोल पंडित, अजय पठारे, आशिष भिंगारदिवे, रोहित शेळके, प्रतीक शिंदे, असलम पठाण, गबर लखन, सुयोग आडागळे आदीसह असंख्य कार्यकर्त्यांनी प्रवेश केला.
दिल्ली गेट निलक्रांती चौक येथे येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) आघाडीच्या बैठकित शहरातील विविध भागातील युवकांनी आरपीआयचे उत्तर महाराष्ट्र सचिव अजय साळवे यांच्या नेतृत्वाखाली आरपीआयमध्ये प्रवेश केला.
आरपीआयचे उत्तर महाराष्ट्र सचिव अजय साळवे यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधून आरपीआयच्या सर्व कार्यकर्त्यांना सामाजिक कार्य करण्यास बळ देण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधारेने चालणार्या पक्षात सर्व युवकांचे स्वागत असून, वंचित घटकातील समाजाच्या न्याय, हक्कासाठी युवक प्रयत्नशील राहण्याचे आवाहन केले.