- Advertisement -
शहरात दहा दिवसीय “महिला उपासीका धम्म प्रशिक्षण शिबिराची” उत्साहात सुरुवात
अहमदनगर (प्रतिनिधी)– अहमदनगर शहरात प्रथमच दहा दिवसीय “महिला उपासीका धम्म प्रशिक्षण शिबिराची” २ एप्रिलला मोठ्या आनंदात व उत्साहात सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी प्रचंड प्रमाणात गर्दी झाली. पुढील दहा दिवस हजारो, बौद्ध बांधवांनी भेट देणार. भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष भगवंत गायकवाड सर व महासचिव राजेंद्र साळवे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. महिला उपासीका शिबिराच्या अध्यक्ष स्थानी प्रा.राम गायकवाड सर होते. शिबिराला मार्गदर्शन करण्यासाठी केंद्रीय शिक्षिका सुरेखाताई सदाफुले, सुनिता ताई गायकवाड, सिंधुताई साळवे उपस्थित होत्या.
शहर शाखा, महिला शाखा, ग्राम शाखा, वार्ड शाखा, यांचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते, “महिला शिबिरासाठी” 30 महिला उपासिका बसल्या आहेत. जिल्हाध्यक्षांनी सर्वच महिलांची ओळख करून, शुभेच्छा दिल्या. राजेंद्र साळवे साहेबांनी सांगितले की, सर्वच महिलांनी जास्तीत जास्त धम्माचा परिचय करून, आपल्याबरोबर उद्या येताना, दोन महिला उपासिका नवीन घेऊन यावे. यावेळी महिला उपासीका शिबिराच्या अध्यक्ष स्थानावरून, प्रा. राम गायकवाड सर म्हटले की, धम्माचा प्रचार प्रसार करावा, व पुढील दहा दिवस महिला शिबिराला, अहमदनगर शहरातील “हजारो बौद्ध बांधवांनी” कुटुंबासोबत आवर्जून भेट द्यावी, अशी विनंती “शहर अध्यक्ष” प्रा. राम गायकवाड सरांनी केली.
यावेळी रवींद्र कांबळे, प्रकाश कांबळे, बनकर बाळासाहेब, माधवराव चाबुकस्वार, जाडकर साहेब, खंदारे सर, गायकवाड सर, खरात सर, कांबळे ए स आय, सतीश भालेराव, अर्चना गायकवाड, रेखा बनकर, मोहिनी, रोहिणी, हर्षा पंचमुख, सारिका सायगावकर, भालेराव मॅडम, धबाले मॅडम, मेश्राम मॅडम, खंदारे मॅडम, गायकवाड मॅडम, खंडागळे मॅडम, अहिरे मॅडम मोठ्या संख्येने महिला उपासीका व बौद्ध बांधव उपस्थित होते.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटल्याप्रमाणे, एक स्त्री शिकली तर दोन कुटुंब, एक माहेरचे व दुसरे सासराचे “धम्मवान व शीलवान” घडतात. त्यामुळे अहमदनगर शहरातील जास्तीत जास्त महिलांनी, “महिला उपासीका धम्म प्रशिक्षण शिबिराला ” भेट द्यावी व या शिबिरामध्ये वंदना स्पर्धा, सूत्तपठण स्पर्धा, निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्ध, रांगोळी स्पर्धा, वाद विवाद स्पर्धा या विविध सांस्कृतिक स्पर्धा घेण्यात येणार आहे….
- Advertisement -