शहरातच मिळणार व्यावसायिक उद्योजकता प्रशिक्षणाचा लाभ
शार्प बिझनेस कन्सल्टन्सी ॲण्ड एमएसएमई ट्रेनिंग इन्स्टिट्यूटला मान्यता
अहमदनगर (प्रतिनिधी)- बेरोजगार युवक-युवती, स्वतःचा उद्योग सुरु करणारे आणि नव उद्योजकांना व्यावसायिक उद्योजकता प्रशिक्षणाचा लाभ शहरात मिळणार आहे. शार्प बिझनेस कन्सल्टन्सी ॲण्ड एम एस एम ई ट्रेनिंग इन्स्टिट्यूट अहमदनगर यांना खादी और ग्रामोद्योग आयोग भारत सरकार, डॉ. बी. आर. आंबेडकर रूरल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ॲण्ड मॅनेजमेंट नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने संपूर्ण महाराष्ट्रात विविध व्यावसायिक उद्योजकता प्रशिक्षण कार्यक्रम घेण्याची मान्यता मिळाली असल्याची माहिती इन्स्टिट्यूटचे संचालक रविराज भालेराव यांनी दिली.
या प्रशिक्षणाच्या माध्यमातून बेरोजगार युवक-युवती, शेतकरी कुटुंबातील मुले, बचत गट, स्वतःचा उद्योग सुरु करणारे व नव उद्योजक यांच्यासाठी विविध व्यावसायिक प्रशिक्षण तसेच विविध सरकारी योजना, बँकांच्या विविध व्यावसायिक योजना, उद्योजकांना प्रोत्साहनपर योजना, विविध व्यावसायिक सबसिडीचे मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
या प्रशिक्षणासाठी मोठ्या शहरात जाण्याची गरज भासणार नसून, एमआयडीसी आयटी पार्क, एल ॲण्ड टी कंपनी चौक, सारस्वत बँकेच्या जवळ, निंबळक रोड येथील शार्प बिझनेस कन्सल्टन्सी व एमएसएमई ट्रेनिंग इन्स्टिट्यूट मध्ये प्रशिक्षण मिळणार आहे.