नेवासा प्रतिनिधी (काकासाहेब नरवणे)
महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभाग व कृषी खाते यांची समन्वय बैठक नामदार दादासाहेब भुसे व श्रीमती नामदार वर्षाताई गायकवाड यांच्या उपस्थितीत वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर पार पडली त्यामध्ये शालेय शिक्षणात कृषी विषयाचा समावेश करावा या संदर्भात सखोल चर्चा झाली व कार्यवाहीसाठी हालचाली चालू झाल्या याचा मनोमन आनंद वाटला असे स्पष्ट मत कृषी शास्त्रज्ञ डॉक्टर अशोक राव ढगे यांनी एका निवेदनाद्वारे प्रसिद्ध केले आहे.
भारत कृषिप्रधान देश असून 63 टक्के जनता शेतीवर प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष अवलंबून आहे त्यासाठी कृषी चे मूलभूत शिक्षण मिळणे काळाची गरज आहे त्यासाठी महाराष्ट्र शासनाने हालचाली सुरू केल्या बद्दल त्यांचे मनापासून स्वागत करतो असे प्रतिपादन डॉक्टर ढगे यांनी केले आहे यासंदर्भात महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर राजाराम देशमुखव शासनाचे सचिव माननीय मुल्ला यांच्या मध्ये पूर्वी बैठकी झाल्या आहेत कृषी शिक्षण शालेय स्तरावर देण्यासाठी बीएससी ऍग्री पदवीधरांना अंतर्भूत शिक्षण संस्थांना करून घ्यावे लागेल महाराष्ट्रामध्ये कृषी शिक्षणाचा प्रसार विशेषतः संशोधन कौशल्य विविध कृषी प्रक्रिया उद्योगाचे तंत्रज्ञान या शिक्षणासाठी पाया शालेय स्तरावर तयार होणे आवश्यक आहे त्याच बरोबर कृषी शिक्षणाची आवड लहानपणी विद्यार्थ्यांना झाल्यास त्याचे दूरगामी परिणाम निश्चितच चांगले होतील सांगोपांग अभ्यास व विचार मंथन केल्यास पाया मजबूत करण्यासाठी चा अभ्यासक्रम तयार करावा लागेल त्यासाठी कृषी क्षेत्रातील प्राध्यापक शास्त्रज्ञ विस्तार कार्यकर्ते अभ्यासू शेतकरी यांच्या सूचनांचा ही समावेश करणे हितावह राहील असे शेवटी डॉक्टर ढगे यांनी प्रसिद्धीपत्रकात निवेदनाद्वारे प्रकाशित केले आहे.