शाळेच्या पहिल्या दिवशी डॉ.ना.ज पाऊलबुद्धे माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांचे स्वागत करीत शालेय साहित्याचे वाटप
शालेय विद्यार्थी हे उद्याच्या भारताचे उज्वल भविष्य – सचिन लोटके
नगर : विद्यार्थ्यांच्या शालेय दशेमध्ये योग्य मार्गदर्शनाची खरी गरज असते ते काम शिक्षक वृंद करत असतात त्या माध्यमातून चांगला विद्यार्थी घडला जातो ते उद्याच्या भारताचे उज्वल भविष्य आहे डॉ. ना ज पाऊलबुद्धे माध्यमिक विद्यालयामध्ये सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थी शिक्षण घेत असून त्यांना चांगल्या दर्जेचे शिक्षण दिले जात आहे शिक्षण क्षेत्रामध्ये अमुलाग्र बदल झाला असून या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये विद्यार्थ्यांना बाल वयातच संगणकीकृत शिक्षण मिळणे गरजेचे आहे शिक्षणाबरोबरच आपली संस्कृती व संस्कार तितकेच महत्त्वाचे असून ती जोपासली जावी सावेडी उपनगरामध्ये डॉक्टर ना. ज पाऊलबुद्धे विद्यालयाने शिक्षण क्षेत्रामध्ये आपल्या कामाचा ठसा उमटविला असल्याचे प्रतिपादन सचिन लोटके यांनी केले.
शाळेच्या पहिल्या दिवशी डॉक्टर ना ज पाऊलबुद्धे माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांचे स्वागत करीत शालेय साहित्याचे वाटप वाटप करताना सचिन लोटके समवेत कुलदीप भिंगारदिवे, मुख्याध्यापक बी एस बिडवे,ए एम गावडे,जे एस केदार, ए एस कर्डिले आदी उपस्थित होते.
कुलदीप भिंगारदिवे म्हणाले की, शाळेचा पहिल्या दिवशी विद्यार्थी मोठ्या उत्साहात आनंदात येत असतात त्यांचे स्वागत करून शालेय साहित्याचे वाटप करत त्यांना शिक्षणाची गोडी निर्माण व्हावी यासाठी शिक्षक वृंद मार्गदर्शन करत असतात. डॉक्टर ना ज पाऊलबुद्धे माध्यमिक विद्यालयाच्या माध्यमातून गरीब कुटुंबातील विद्यार्थी घडविण्याचे काम होत आहे असे ते म्हणाले.