आ.संग्राम जगताप यांच्या पाठपुराव्याला यश
अहमदनगर प्रतिनिधी – शहराचा नियोजनबद्ध व कायमस्वरूपी विकासाचे प्रश्न मार्गी लागावे यासाठी शासन दरबारी विविध खात्याकडे निधीसाठी पाठपुरावा केला जात आहे.त्यानुसार टप्प्याटप्प्याने विकास कामासाठी निधी प्राप्त होत आहे.अहमदनगर महापालिका क्षेत्रात मूलभूत सोयी सुविधा विकास या योजनेअंतर्गत रस्त्याच्या कॉंक्रिटीकरण कामासाठी दहा कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. हा निधी मिळविण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे मोलाचे सहकार्य मिळत आहे या सर्व कामासाठी शासनाकडून १००% निधी मिळणार आहे.त्यानुसार एप्रिल २०२२ च्या विवरण पत्रानुसार
१.मनपा हद्दीतील शांती नगर ते भगवान बाबा नगर ते गंगा टॉवर्स ते सचिन नगर बिडवई घरापर्यंत कॉंक्रिटीकरण रस्ता विकसित करण्याकरता तीन कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.
२. अहमदनगर महानगरपालिका हद्दीतील सारसनगर मधील धनश्री बंगला ते सारस कॉलनी ते शिवगंगा टॉवर ते ससाने घरापर्यंत रस्ता कॉंक्रिटीकरण कामासाठी सुमारे दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.
३. मनपा हद्दीतील सारस नगर मधील वर्धमान रेसिडेन्सी ते जय बजरंग व्यायाम शाळा व कपिलेश्वर कॉलनी ते भगवान बाबा मंदिरा पर्यंत रस्ता कॉंक्रिटीकरण कामासाठी दीड कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.
४. मनपा हद्दीतील बुरडगाव
रोडवरील चाणक्य चौक ते डॉक्टर कॉलनी पर्यंत रस्ता कॉंक्रिटीकरण कामासाठी साडेतीन कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे असा एकूण दहा कोटी रुपयांची विकास कामे सुरू होणार आहे.
यापुढील काळातही शहर विकासासाठी शासनाकडून मोठ्या प्रमाणात निधी प्राप्त होणार आहे विविध विकासा कामाचे प्रस्ताव शासन दरबारी पाठविले आहेत टप्प्याटप्प्याने सर्व प्रस्तावाला मंजुरी मिळणार असून ही सर्व कामे मार्गी लागल्यानंतर नगर शहराची ओळख विकसित शहर म्हणून केली जाईल अशी माहिती आ.संग्राम जगताप यांनी दिली.