आमदार संग्राम जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त पंतप्रधान जन आरोग्य योजनेचे कार्ड वाटप
शासनाच्या योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत घेऊन जाण्याचे काम सुरू – माजी नगरसेवक प्रकाश भागानगरे
नगर : केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजना असतात, मात्र सर्वसामान्य जनतेला त्या योजनांची माहिती नसल्यामुळे त्यांना लाभ घेता येत नाही, यासाठी शासनाच्या योजनांची समाजामध्ये जनजागृती करत त्यांना लाभ मिळवून दिला जातो, पंतप्रधान जन आरोग्य कार्डच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला आरोग्याच्या सुविधा मिळणार आहेत, यासाठी सारसनगर परिसरामध्ये आ. संग्राम जगताप यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पंतप्रधान जन आरोग्य कार्ड वाटप करण्यात आले आहे, या सारसनगर परिसरामध्ये शासनाच्या योजना घरापर्यंत घेऊन जाण्याचे काम केले जाते असे प्रतिपादन माजी नगरसेवक प्रकाश भागानगरे यांनी केले.
आमदार संग्राम जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त पंतप्रधान जन आरोग्य योजनेचे कार्ड वाटप माजी नगरसेवक प्रकाश भागानगरे यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी प्रा. माणिकराव विधाते, माजी नगरसेवक संजय चोपडा, महादेव कराळे, मळू गाडळकर, भाऊसाहेब पांडुळे, जॉय लोखंडे, धर्मा करंडे, किरण कटारिया आदीसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
माजी नगरसेवक संजय चोपडा म्हणले की, प्रभाग क्रमांक 14 मधील गरजूवंत नागरिकांचे पंतप्रधान जन आरोग्य योजनेचे कार्ड तयार करण्यासाठी सर्व कागदपत्राची पूर्तता केली व मोठ्या संख्येने कार्डचे वाटप करण्यात आले त्यामुळे सर्वसामान्य जनतेला मोफत आरोग्याच्या सुविधा मिळतील असे ते म्हणाले.