नेवासा फाटा (कमलेश गायकवाड ) – संपूर्ण भारताचे लक्ष लागलेल्या शिर्डी लोकसभा मतदार संघाच्या जागेवर दिग्गज उमेदवारांकडून दावे – प्रतिदावे केले जात असतानाच इन्सानियत पार्टी कडून योहान साळवे यांची उमेदवारी जाहीर झाल्याने उमेदवारांची चिंता वाढल्याचे बोलले जात आहे.
लोकसभेच्या शिर्डी मतदार संघातून विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांच्यासह माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे, तसेच श्रीमती उत्कर्षा रूपवते यांच्यातच काट्याची टक्कर होण्याचा अंदाज असतानाच इन्सानियत पार्टीकडून सामाजिक कार्यकर्ते योहान रोहिदास साळवे यांना निवडणूक रिंगणात उतरविण्यात येत असल्याचे समोर आल्याने या मतदार संघातील राजकीय समीकरणे झपाट्याने बदलणार आहेत. साळवे हे कोरी पाटी म्हणून प्रथमच निवडणुकीला सामोरे जात असल्याने त्यांच्या उमेदवारीचे या मतदार संघातील सर्वच तालुक्यांतून उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले आहे. साळवे यांना मतदारांचा मिळत असलेला पाठिंबा पाहता त्यांच्या माध्यमातून प्रस्थापित राजकीय उमेदवारांसमोर तगडे आव्हान उभे राहण्याचा राजकीय जाणकारांचा होरा आहे. साळवे यांच्या अनपेक्षित उमेदवारीने वाकचौरे, लोखंडे तसेच रूपवते या तगड्या उमेदवारां मध्ये प्रतिस्पर्धी आल्याने या मतदार संघात राजकीय बदलाचा घाट घातल्याची सुरू असलेली चर्चा त्यामुळेच गांभीर्याने घेतली जाऊ लागली आहे.
इन्सानियत पार्टी सेल व महाराष्ट्र राज्य मानवता शेतकरी संघटनेचे शिर्डी लोकसभा उमेदवार योहान साळवे यांनी उमेदवारी घोषित करताना, वाढती बेरोजगारीवर उपाय योजना, शेतकऱ्यांना हमीभाव आणि हक्काची बाजारपेठ मिळवून देणार, शेतकरी विरुद्ध जाचक कायदे लोकसभेत मंथन घडवून आणणार, शिर्डी लोकसभा मतदारसंघात वीज पाणी व स्वच्छता यावर विशेष भर देणार, प्रलंबित परळी रेल्वे मार्ग यावर निधी पूर्तता करून देणार, पर्यटन स्थळ तसेच धार्मिक स्थळ यांना विशेष अशी पर्यटन निधी उपलब्ध करून देणार, शेतकऱ्यांच्या पिक विमा कंपन्याकडून मदातीसाठी विशेष प्रयत्न करणार, धरणग्रस्त व प्रकल्पग्रस्त बाधित शेतकऱ्यांना, नोकरीसाठी विशेष प्रयत्न करणार व निधी मिळवून देणार, कर्जमाफीसाठी तारांकित प्रश्न उपस्थित करून लक्षवेधी सूचना मांडून भरिव मदत मिळून देणार, आणि कायमचा महाराष्ट्र राज्य दुष्काळग्रस्त मुक्त करणार, स्पर्धा परीक्षा केंद्र व मार्गदर्शन केंद्र प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी उभे करणार, संघटित व्हा आणि साक्षर बना यासाठी माझी उमेदवारी असणार, मानवता शेतकरी संघटना यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी विशेष प्रयत्न करणार आमचे प्रदेशाध्यक्ष नरेंद्र पाटील काळे यांचे विशेष सहकार्य घेऊन आता आरपारची लढाई शेतकऱ्या प्रतिसाद वेदना घेऊन व बेरोजगारांच्या हालापिष्ट दूर करण्यासाठी मतदारांनी विश्वास दाखवल्यास तो सार्थ ठरविण्याचे अभिवचन साळवे यांनी यानिमित्ताने दिले आहे.