शिर्डी लक्झरी बस लुट प्रकरणातील 9 वर्षापासुन फरार असलेला आरोपी जेरबंद,
स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगरची कारवाई.
प्रस्तुत बातमीची हकिगत अशी की, दिनांक 28/04/2015 रोजी फिर्यादी श्री. रमेशभाई भाईचंद पटेल रा. नवाधर कोसा, ता. विसनगर, जिल्हा मेहसाना, गुजरात हल्ली रा. सावंत चेंबर्स, ख्रिस्तगल्ली, अहमदनगर हे अहमदनगर येथुन लक्झरी बसणे सुरत, गुजरात येथे जाताना शिर्डी येथील खंडोबा मंदीरा समोर 2 अनोळखी इसमांनी फिर्यादी व साक्षीदार यांना पोलीस असल्याची बतावणी करुन तुम्ही चोरी करुन आले असुन पोलीस स्टेशनला चला असे म्हणुन लक्झरी बस मधुन खाली उतरवुन तवेरा गाडीत बसवले व फिर्यादी जवळील 5,00,000/- रुपये रोख रक्कम बळजबरीने काढुन घेवून गेले व फिर्यादीस कोपरगांव येथे सोडून निघुन गेले बाबत शिर्डी पो.स्टे.गु.र.नं. 138/2015 भादविक 395, 363, 170, 34 प्रमाणे दरोड्याचा गुन्हा दाखल आहे.
सदर गुन्ह्याचे तपासात तात्कालीन पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी गुन्ह्याचा तपास करुन आरोपी नामे 1) राजेंद्र मोहन फडतरे, 2) विकास पोपट झरेकर, 3) मनोज दत्तात्रय शिंदे, 4) सचिन प्रकाश राजगुरु सर्व रा. केडगांव, अहमदनगर, 5) पंकज तान्हाजी गडाख रा. टाकळी काझी, ता. नगर, 6) मच्छिंद्र पोपट कांडेकर रा. केडगांव, ता. नगर (फरार) व 7) नितीन पटेल रा. कोर्ट गल्ली, अहमदनगर असे आरोपी निष्पन्न करुन आरोपी क्र. 1 ते 5 व 7 यांना ताब्यात घेवुन गुन्हा उघडकिस आणला होता. परंतु आरोपी नामे मच्छिंद्र पोपट कांडेकर हा अद्याप पावेतो फरार होता.
मा. श्री. राकेश ओला साहेब, पोलीस अधीक्षक, अहमदनगर यांनी पोनि/श्री. दिनेश आहेर यांना आगामी लोकसभा निवडणुकीचे अनुषंगाने जिल्ह्यातील फरार व पाहिजे आरोपींचा शोध घेवुन मिळुन आल्यास आवश्यक कारवाई करणे बाबत आदेशित केले होते.
नमुद आदेशान्वये पोनि/श्री. दिनेश आहेर यांनी सफौ/राजेंद्र वाघ, रविंद्र कर्डीले, विशाल दळवी, देवेंद्र शेलार, मयुर गायकवाड व उमाकांत गावडे अशांचे पथक नेमुन फरार व पाहिजे आरोपींचा शोध घेवुन कारवाई करणे बाबत आवश्यक सुचना देवुन पथकास रवाना केले. पथक फरार व पाहिजे आरोपींची माहिती घेत असताना पथकास वर नमुद गुन्ह्यातील फरार आरोपी नामे मच्छिंद्र पोपट कांडेकर रा. केडगांव, अहमदनगर याची माहिती काढत असताना तो गोंदीया, नागपुर व झारखंड या ठिकाणी त्याचे नाव बदलुन, ओळख लपवुन राहत असल्याची माहिती प्राप्त झाली होती. सदर आरोपी आज दिनांक 28/03/24 रोजी कात्रड, वांबोरी, ता. राहुरी येथे त्याचे नातेवाईकांकडे येणार आहे. अशी गुप्तबातमीदारा मार्फत खात्रीशीर माहिती मिळाली. पथकाने लागलीच कात्रड, वांबोरी, ता. राहुरी येथे जावुन फरार आरोपीचे नातेवाईकाचे वास्तव्याबाबत माहिती घेवुन नातेवाईकांचे घराचे आजु बाजूला सापळा रचुन थांबलेले असताना सदर ठिकाणी 1 तोंड बांधलेला इसम संशयीतरित्या घरामध्ये गेल्याचे दिसुन आल्याने पथकाने तात्काळ सदर ठिकाणी जावुन संशयीतास ताब्यात घेवुन त्यास त्याचे नाव गांव विचारले असता त्याने त्याचे नाव 1) मच्छिंद्र पोपट कांडेकर रा. एकनाथ नगर, केडगांव, ता. नगर असे असल्याचे सांगितले. त्याचेकडे वर नमुद गुन्ह्याचे अनुषंगाने विचारपुस करता आरोपीने सन 2015 मध्ये रमेश भाईचंद पटेल हे हवालाची 5 लाख रुपये रोख रक्कम अहमदनगर येथुन लक्झरी बसणे सुरत, गुजरात येथे जाणार असल्याने त्यांचे लक्झरी बसचा अहमदनगर येथुन तवेरा गाडीतुन पाठलाग करुन त्यांना शिर्डीत लुटल्याचे सांगितले आहे.
आरोपी नामे मच्छिंद्र पोपट कांडेकर हा सराईत गुन्हेगार असुन त्यांचे विरुध्द दरोडा व गंभीर दुखापत अन्वये एकुण 3 गुन्हे दाखल आहेत ते खालील प्रमाणे –
अ.क्र. पोलीस स्टेशन गु.र.नं. व कलम
1. कोतवाली 91/2013 भादविक 395
2. कोतवाली 154/2015 भादविक 325, 323, 504, 504, 34
3. शिर्डी 138/2015 भादविक 395
सदरची कारवाई मा.श्री. राकेश ओला सो. पोलीस अधीक्षक, अहमदनगर व मा.श्री. वैभव कलुबर्मे साहेब, अपर पोलीस अधीक्षक, श्रीरामपूर व मा.श्री. शिरीष वमने साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी, शिर्डी विभाग यांचे सुचना व मार्गदर्शना खाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.