कर्जत प्रतिनिधी – गणेश जेवरे
जनतेच्या आरोग्याची काळजी घेणारा असा मुख्यमंत्री यापूर्वी राज्यांमध्ये झालेला नाही,असे प्रतिपादन राज्याचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी कर्जत तालुक्यामध्ये बोलताना केले.
राज्याचे मंत्री शंकरराव गडाख हे आज कर्जत तालुक्यात दौऱ्यावर आले होते.यावेळी शिवसेनेच्या आठ शाखांचे उद्घाटन व माहिजळगाव येथील आरोग्य शिबिराचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले.
यावेळी नगर दक्षिण चे जिल्हाप्रमुख राजेंद्र दळवी, तालुकाप्रमुख बळीराम यादव,अमृत लिंगडे,महावीर बोरा, दीपक गांगर्डे,सुभाष जाधव,शिवाजी नवले,पोपट धनवडे, अक्षय घालमे,रवी खेडकर अक्षय तोरडमल,बबन दळवी, नाझीम काजी ,शरद यादव ,नितीन तोरडमल, अंबादास मांडगे ,बाळासाहेब निबोरे, पाबळे सर ,रावण काळे ,अविनाश मते ,कृष्णा बामणे, संपत काळदाते, महेश काळदाते ,लक्ष्मण गव्हाणे ,यांच्यासह अनेक पदाधिकारी व मोठ्या संख्येने शिवसैनिक शेतकरी महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना शंकरराव गडाख म्हणाले की, कोरोनाची संकट आजही राज्यामध्ये कायम आहे.तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या महामारी मध्ये जनतेचे आरोग्य खऱ्या अर्थाने चांगले राहण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व शिवसेना पक्ष हे प्रामाणिक प्रयत्न करीत आहेत. शिवसेनेच्या वतीने जिल्ह्यात ठिकाणी आरोग्य शिबिर घेऊन नागरिकांची तपासणी करण्यात येत आहे.
तालुक्यातील माहिजळगाव येथे आज आरोग्य शिबिराचे उद्घाटन करण्यात आले असून ,पुढील काळामध्ये तालुक्यातील इतर गावांमध्ये देखील अशा पद्धतीने आरोग्य शिबिर घेण्यात येणार आहे. देशामध्ये कोरोना काळात जनतेची सर्वात चांगली काळजी घेण्याचे काम राज्याचे मुख्यमंत्री व आघाडी सरकारने केले आहे. नागरिकांचे या जीवघेण्या आजारापासून संरक्षण होण्यासाठी मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीम राबवली जात आहे.
लसीकरणा मध्ये महाराष्ट्र राज्य देशात अग्रेसर आहे. मुख्यमंत्र्यांनी जनतेच्या सुरक्षेला प्राधान्य दिले आहे, अशा पद्धतीने सातत्यानं केवळ जनतेचा विचार करणारे नेतृत्व आपल्या राज्याला मिळाले आहे हे खऱ्या अर्थाने आपले भाग्य आहे असे श्री गडाख यावेळी बोलताना म्हणाले.
श्री गडाख यांनी यावेळी ज्या नागरिकांनी करूना प्रतिबंधक लस घेतलेली नाही ती तातडीने घ्यावी तसेच ज्यांचा प्रथम दोष पूर्ण झाला आहे त्यांनी दुसरा डोस घ्यावा , आपण आपला परिवार ,आपले गाव ,आपला तालुका व जिल्हा आणि राज्य सुरक्षित राहण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आव्हान देखील यावेळी बोलताना केले.
कर्जत तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शिवसेनेच्या शाखा निघत असल्याबद्दल त्यांनी जिल्हाप्रमुख राजेंद्र दळवी , तालुकाप्रमुख बळीराम यादव व शिवसेनेचे सर्व पदाधिकारी आणि शिवसैनिक यांचे कौतुक करताना प्रत्येक गावात आणि घराघरामध्ये शिवसैनिक निर्माण करण्यासाठी पुढील काळामध्ये जोमाने प्रयत्न करा असे सांगितले.
यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र दळवी बोलताना म्हणाले की ,राज्याचे मुख्यमंत्री व शिवसेना हे राजकारणापेक्षा समाजकारण करण्यावर भर देतात हे आता सर्व जनतेच्या लक्षात आले आहे. आरोग्य शिबिराच्या माध्यमातून गावोगावी नागरिकांचे आरोग्य तपासणी शिवसेनेच्या माध्यमातून होत आहे,जिल्ह्यामध्ये राज्याचे मंत्री शंकरराव गडाख यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेची बांधणी करण्याचे काम जोमात सुरू आहे.
आजही तालुक्यात विविध ठिकाणी शाखा उद्घाटन करण्यात आले आहे.जनतेचा व युवकांचा आजही शिवसेनेमध्ये मोठ्या प्रमाणात प्रवेश होत आहेत.आगामी होणाऱ्या सर्व निवडणुकांची तयारी या माध्यमातून शिवसेना करीत आहे असेही श्री दळवी यावेळी बोलताना म्हणाले.
आभार तालुकाप्रमुख बळीराम यादव यांनी मानले.