शिवसेनेच्या वर्धापन दिननिमित्ताने श्री विशाल गणेश मंदिरात महाआरती करुन लाडूंचे वाटप
शिवसेनेने जनसामान्यांमध्ये स्वत:चे वेगळे अस्तित्व निर्माण केले – संभाजी कदम
नगर- हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या ज्वलंत विचारातून शिवसेनेची स्थापना झाली. मराठी माणसाच्या हक्कासाठी लढणार्या शिवसेनेने जनसामान्यांमध्ये स्वत:चे वेगळे अस्तित्व निर्माण केले. 80 टक्के राजकारण व 20 टक्के समाजकारण हे ध्येय ठेवून जनतेच्या सेवेसाठी शिवसैनिक दिवस-रात्र काम करत आहेत. शिवसैनिकांच्या जीवावर राज्यात सत्ता व अनेक स्थानिक स्वराज्य संस्थेवर भगवा फडकविला. स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारावर आजही शिवसैनिक काम करत आहे. स्थापना दिनानिमित्त आज ग्रामदैवत श्री विशाल गणेशाची आरती करुन जनसेवेत कायम राहण्याचा सर्वांनी संकल्प केला असल्याचे प्रतिपादन शिवसेनेचे शहरप्रमुख संभाजी कदम यांनी केले.
शिवसेनेच्या 58 व्या वर्धापन दिननिमित्ताने नगर शहर शिवसेनेच्यावतीने शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणेश मंदिरात महाआरती करुन लाडूंचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी शहरप्रमुख संभाजी कदम, संजय शेंडगे, बाळासाहेब बोराटे, सुरेखा कदम, मंगल लोखंडे, आशा निंबाळकर, अरुणा गोयल, शाम नळकांडे, सचिन शिंदे, अमोल येवले, विजय पठारे, संतोष गेनप्पा, हर्षवर्धन कोतकर, रवी वाकळे, प्रशांत गायकवाड, दिपक खैरे, परेश लोखंडे, गौरव ढोणे, सुरेश तिवारी, अशोक दहिफळे, संदिप दातरंगे, दिपक भोसले, शाम कोके, अरुण झेंडे, अण्णा घोलप, बंटी खैरे, संतोष डमाळे, डॉ.श्रीकांत चेमटे, अभिजित अष्टेकर आदिंसह शिवसैनिक उपस्थित होते.
याप्रसंगी आशा निंबाळकर म्हणाल्या, शिवसेना हा जनसामान्यांचा प्रश्न सोडविणारा पक्ष आहे. गेल्या 58 वर्षांपासून जनतेच्या प्रश्नांसाठी कार्यरत राहून ते सोडविले. विशेषत: महिलांमध्ये आत्मविश्वास निर्माण करुन त्यांना लढण्याचे बळ दिले. त्यामुळे जनतेचा शिवसेनेवर मोठा विश्वास आहे. शिवसेनेने सर्वसामान्य कार्यकर्त्यांना अनेक मोठ-मोठ्या पदावर काम करण्याची संधी दिली. यापुढेही शिवसैनिक नागरिकांच्या प्रश्नांसाठी कार्यरत राहतील, असे सांगितले.