शेवगाव प्रतिनिधी –
तालुक्यातील मौजे थाटे येथिल महादेव केदार यांच्या गट नंबर २३/२ या शेतीची भाविकीतील सामाईक वहीती गेल्या काही वर्षापासून चालू असून सदरील वहीती ही वेळो वेळी अडचण निर्माण करून आर्थिक फटका सहन करावा लागत असल्याने महादेव केदार यांनी सामाईक क्षेत्राची मोजणी करण्याचा निर्णय घेतला असता. त्या बाबत शेवगाव येथील भूमी अभिलेख कार्यालय शेवगाव येथे दि.०६/०४/२०२१ रोजी अर्ज व चलन देवून मोजणीची तारीख निश्चित करण्यासाठी आवश्यक ती उपाय योजना करण्यात आली. मात्र सामाईक क्षेत्रातील हिस्सेदार अंबादास लहानू केदार, गणेश लहानू केदार व त्यांचे पुतणे अक्षय भानुदास केदार व राहुल भानुदास केदार यांनी सदरील नोंदणीची मंजूर होताच मोजणीस हरकत अडथळा निर्माण करत आम्हाला दमदाटी करण्यास सुरुवात केली. तसेच वेळो वेळी अडचण निर्माण करून आम्हाला त्रास होईल अशी वागणूक करू लागले. या बाबत आम्ही दुर्लक्ष केले असता.
दि.०९/०९/२०२१ रोजी सायंकाळी ४.३० वा. सुमारास वरील लोकांनी शोभा महादेव केदार, महादेव जयदेव केदार, अक्षय महादेव केदार, बाळकृष्ण महादेव केदार आदींना लोखंडी विळ्याने जखमी केले, लाकडी काठीने, लाथा बुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ केली व एके एकेंच खून करून टाकू अशी धमकी दिल्याने अंबादास लहानू केदार, गणेश लहानू केदार, अक्षय भानुदास केदार व राहुल भानुदास केदार यांच्यावर भारतीय दंड संहिता १८६० अन्वये ३२४,३२३,५०४,५०६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. या बाबत पुढील कारवाई चालू असल्याची माहिती पोलीस स्टेशन शेवगाव येथून देण्यात आली.