जामखेड (प्रतिनिधी नासीर पठाण ) –
जामखेडला शुक्रवार ( दि १३ ) श्रीनागेश्वर पालखी सोहळा मोजक्या भक्तांच्या उपस्थितीत औपचारिक संपन्न झाला.
जामखेडचे ग्रामदैवत श्रीनागेश्वर यात्रेनिमित्त येथे श्रीनागेश्वर पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. कोरोनामुळे येथे होणारे सर्व धार्मिक कार्यक्रम या ही वेळी बंद होते
जामखेडचे ग्रामदैवत श्रीनागेश्वरची नागपंचमीच्या निमित्ताने यात्रा असते. यानिमित्ताने श्रीनागेश्वर पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. दरवर्षी सकाळी ९ नंतर उत्सवाची सुरुवात होते मात्र उत्सवाला गर्दी होऊ नये म्हणून मंडळाने अचानक वेळ बदलली सकाळी ७ ते ९.०० या वेळेत पूर्ण कार्यक्रम आटोपून घेतला.सकाळी यजमान पत्रकार मिठ्ठूलाल नवलखा व त्यांच्या पत्नी ,सौ. मनिषा मिठ्ठूलाल नवलाखा यांच्या हस्ते विधिवत पूजा झाली.आरती करून श्री नागेश्वराचा मुखवटा पालखीमध्ये ठेवण्यात आला हरहर महादेव ॐ नमः शिवाय व ज्ञानोबा तुकाराम च्या जयघोषात मोजक्या भजनी मंडळांच्या टाळ मृदुंगांच्या गजरात पालखी मिरवणुकीस सुरुवात झाली. दरवर्षी जामखेड शहरात ही मिरवणूक असते मात्र या वेळी मंदिराच्या प्रवेशद्वारापासूनच परतली व आरती करुन उत्सवाची सांगता झाली.
भजनी मंडळात संत वामनभाऊ महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यापक दादासाहेब महाराज सातपुते सीताराम राळेभात, हरिदास गुंड, दिलीपकुमार राजगुरू संतोष बारगजे, सुरेश महाराज कुलथे चोपदार मनोहर राजगुरू हे मोजके भजनी सहभागी झाले होते.
हा संपूर्ण सोहळा यशस्वी करण्यासाठी श्री नागेश्वर सेवा मंडळाचे अध्यक्ष बाबासाहेब खराडे, मिलिंद ब्रम्हे, आण्णा भोसले बाळासाहेब आरेकर महादेव घोरपडे प्रवीण राऊत, शंकर राऊत, महादेव पानसांडे ,बबलू टेकाळे अमोल निमोणकर, गणेश माने रोनित खुपसे बबलू राऊत रविराज क्षीरसागर आकाश टेकाळे कैलास घुगे ओम बारगजे यांनी विशेष परिश्रम घेतले.