- Advertisement -
कर्जत प्रतिनिधी – गणेश जेवरे
श्री जगदंबा देवस्थान राशीन यांनी जिल्हाधिकारी यांचे दिनांक ६ ऑक्टोबर २०२१ च्या आदेशाप्रमाणे व प्रांताधिकारी कर्जत अजित थोरबोले यांनी दिलेल्या सूचनांनुसार ऑनलाइन पास ची सुविधा तयार केली आहे.
सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करून आपण ऑनलाइन पास घ्यायचा आहे. एक भाविक स्वतः सह एकूण ४ लोकांचा दर्शन पास काढू शकतात.
सदरचा पास हा दर्शनासाठी प्रवेशावेळी दाखवायचा आहे. सोबत आधारकार्ड ठेवायचे आहे. ई पास सोबत घेऊनच मंदिरात प्रवेश करायचा आहे. सदरचा पास हा एक दिवसासाठी एक वेळ दर्शन घेण्यासाठीच आहे. कोरोना प्रादुर्भाव वाढत असल्याने मा. जिल्हाधिकारी यांचे आदेशाप्रमाणे एका दिवसात ५००० लोकांना मंदिरात दर्शनासाठी परवानगी द्यायची आहे.
मंदिरात प्रवेश करणाऱ्या भाविकांना सूचना…
१)राशीन च्या श्री जगदंबा देवीच्या दर्शनाला येणाऱ्या सर्व भाविकांना सूचना आहे की मंदिरामध्ये आत जाण्याचा आणि बाहेर पडण्याचा मार्ग वेगवेगळा आहे. त्यासाठी आपल्या चपला, बूट हे आपल्या गाडीतच ठेवा.
२)प्रशासनाच्या सुचणेनुसार कोरोना चा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी भाविकांना कोणत्याही प्रकारची वस्तू आतमध्ये न्हेण्यासाठी परवानगी नसल्याने हार, फुले, पेढे, गुलाल,नारळ आशा कोणत्याही प्रकारची वस्तू घेऊन मंदिरात येऊ नये.परवानगी नसल्याने प्रवेश मिळणार नाही.
३)मंदिरामध्ये दर्शन रांगेत चालत असताना बांबू किंवा पाईपला हात लावू नका, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू शकतो.
४)कोरोना अनुषंगाने सर्व भाविकांनी मास्कचा वापर करावा,विणामास्क परवानगी नाही तसेच अशा विणामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यात येईल..
५)आपली वाहने नेमून दिलेल्या पार्किंग च्या ठिकाणीच पार्क करावीत.अस्ताव्यस्त कुठेही गाड्या उभ्या करू नये. यात्री निवास च्या कंपाऊंड च्या आतमध्ये तसेच नेमून दिलेल्या ठिकाणी वाहने पार्क करावीत.
- Advertisement -