संगमनेर प्रतिनिधी – महाराष्ट्रात गोवंशाच्या बेकायदा कत्तलीसाठी कुप्रसिद्ध असलेल्या संगमनेरातील कत्तलखान्यांवर आजवरची ही सर्वात मोठी कारवाई करण्यात आली आहे.
भिवंडी येथील प्राणी कल्याण अधिकारी यतीन जैन यांच्या माहितीनुसार पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या आदेशाने शनिवारी रात्रभर ही कारवाई सुरु होती.
या कारवाईत पाच कत्तलखान्यांमधून जवळपास ६२ लाख रुपयांच्या ३१ हजार किलो गोवंशाच्या मांसासह पोलिसांनी १ कोटी ४ लाख ५० हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
त्याचबरोबर या कारवाईत पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे. अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष पुन्हा एकदा अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यावर खिळले आहे.