संविधान बदलासाठी भाजपाला हव्यात ४०० पार जागा !

- Advertisement -

संविधान बदलासाठी भाजपाला हव्यात ४०० पार जागा !

आंबेडकरी चळवळीचे नेते अशोक गायकवाड यांचा आरोप

नगर : प्रतिनिधी

देशाचे संविधान बदलण्यासाठी भाजपाला लोकसभेत चारसो पार जागा हव्या असल्याचा आरोप करतानाच संविधान बदलाच्या विरोधात या राज्यामध्ये बौध्द, आदिवासी, ख्रिश्‍चन, मुस्लिम हे मतदान करतील असा विश्‍वास आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते शिवसेनेचे जिल्हा समन्वयक अशोक गायकवाड यांनी व्यक्त केला.लोकसभा निवडणूकीसंदर्भात गायकवाड यांनी पत्रकार परीषदेत आपली भूमिका स्पष्ट करीत भाजपाच्या भूमिकेवर तिव्र ताशेरे ओढले.

गायकवाड म्हणाले, देशाचे संविधान बदलण्याची भूमिका भाजपाकडून वारंवार जाहिर करण्यात येत आहे. दोन वर्षापूर्वी देशाचे संविधान दिल्लीत जाळण्यात आले. भाजपाच्या अनेक नेत्यांनी संविधान बदलाचे सुतोवाच केले आहे. संविधान हा लोकशाहीचा आत्मा आहे. संविधानाचे संरक्षण करण्याची जबाबदार समाजातील सर्व घटकांची आहे. विविध जाती, धर्म, पंथ मिळून हा देश उभा असल्याचे गायकवाड यांनी सांगितले.

गायकवाड म्हणाले, या लोकांना संविधानाने एका सुत्राने बांधून ठेवले आहे. संविधान बदलून धर्माधिष्टीत राज्य व्यवस्था आणण्याचे स्वप्न पाहणारे, या देशात हुकूमशाही आणणारे, लोकशाहीचे अधिकार कमी करून हुकूमशहाला अधिकार देण्याविरोधात आंबेडकरी चळवळीतील विशेषतः या समाजातील सुशिक्षित तरूणांना घटना बदलण्याच्या भूमिकेस स्पष्टपणाने विरोध असल्याचे गायकवाड यांनी स्पष्ट केले.

▪️चौकट

आंबेडकर, आठवले यांनी भूमिका स्पष्ट करावी

घटना बदलण्याची भाषा करणारांच्या हातामध्ये हात घालणारे प्रकाश आंबेडकर, रामदास आठवले यांनी संविधानामधील बदलासंदर्भात त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करावी. ते म्हणतील संविधान बदलणार नाही, परंतू संविधान बदलण्याची वेळ का आली तर आम्हाला चारसो पार जागा मिळवायच्या आहेत. हाच चारशेचा आकडा संशयीत आहे असे गायकवाड म्हणाले.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles