संस्कृती ढगे हिचे निट परीक्षेत यश
जीवशास्त्र विषयात मिळवले सर्वाधिक गुण
अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील कल्याणरोड, आदर्शनगर येथील कु. संस्कृती ढगे हिने निट परीक्षेत उत्तम गुण मिळवून घवघवीत यश प्राप्त केले. जीवशास्त्र विषयात 360 पैकी 326 गुण प्राप्त करुन व सर्व विषयात 557 गुण मिळवून तिने आपली गुणवत्ता सिध्द केली.
जीवशास्त्र विषयासाठी तिला प्रा. एल. बी. जाधव यांचे मार्गदर्शन लाभले. जाधव सरांनी घेतलेल्या सरावामुळे व मार्गदर्शनाने जीवशास्त्र विषयात चांगले गुण प्राप्त करता आल्याची भावना ढगे हिने व्यक्त केली. संस्कृतीचे वडिल संतोष ढगे व आई मंगल ढगे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षक असून लहानपणापासूनच आपल्या मुलीची आवड पाहून तिला शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्याचे काम केले.
संस्कृती ढगे हिने मिळवलेल्या यशाबद्दल तिचा प्रा.एल.बी. जाधव यांनी सत्कार केला. प्राचार्य शरद मेढे, प्राचार्य विलास साठे, प्रा.डॉ. महेबुब सय्यद, प्रकाश मेढे, प्रा.डि.आर. जाधव, डॉ. ननवरे, प्रा.हनुमंत गायकवाड, थोरात, प्रा. सुर्यवंशी यांनी तिचे अभिनंदन केले आहे. त्याचबरोबर तिचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.