पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त विचार भारती व उत्कर्ष फाउंडेशन यांच्या वतीने अहिल्यानगर शहरात सांस्कृतिक महोत्सवानिमित्त पारंपरिक मिरवणूक
समाजात बदल घडवण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे मोठे योगदान – मा. महापौर बाबासाहेब वाकळे
नगर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रीशताब्दी जयंतीनिमित्त अहिल्यानगर येथे विचार भारती व उत्कर्ष फाउंडेशन यांच्यावतीने सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. आज श्रीराम चौक येथून पारंपारिक मिरवणूक काढत पाईपलाईन, भिस्तबाग चौक, कुष्ठधाम रोड, प्रोफेसर कॉलनी चौक, चौथे छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, दिल्ली गेट, चितळे रोड, नवी पेठ, पांचपीर चावडी, माळीवाडा, मार्केट यार्ड चौक, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा या मार्गावरून मिरवणूक काढण्यात आली, यामध्ये महाराष्ट्रातील लोककलावंत, धनगरी ढोल, पथक, आदिवासी होळी नृत्य, आदिवासी कावड नृत्य, आदिवासी गौरी नृत्य, आदिवासी टिपरी नृत्य, आदिवासी फुगडी नृत्य सादर करत नगरकरांची मने जिंकली आहे. ठिकठिकाणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले, या माध्यमातून आपली संस्कृती जोपासली जात असते, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव नगर शहराला देण्यात आले असून आता आपले शहर अहिल्यानगर म्हणून ओळखले जाणार आहे त्यांचे कर्तृत्व महान असून समाजाला नेहमीच प्रेरणा देणारे आहेत, समाजात बदल घडवण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी सांस्कृतिक धार्मिक परंपरा आणि आर्थिक विषयाची सांगड घालून प्रयत्न केले असे प्रतिपादन सांस्कृतिक महोत्सव समितीचे कार्याध्यक्ष माजी महापौर बाबासाहेब वाकळे यांनी केले.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती निमित्त अहिल्यानगर येथून विचार भारतीय उत्कर्ष फाउंडेशन यांच्या वतीने सांस्कृतिक महोत्सवानिमित्त पारंपारिक शोभायात्रा काढण्यात आली, यावेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सांस्कृतिक महोत्सव कार्याध्यक्ष मा.महापौर बाबासाहेब वाकळे, निमंत्रक बलभीम पठारे, विचार भारती अध्यक्ष अरुण कुलकर्णी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर, रवींद्र मुळे, सुधीर लांडगे, प्रसाद सुवर्णपाठकी, अशोक गायकवाड, अनिल ढवन, डॉ.सागर बोरुडे, प्रशांत भालेराव, स्वप्नील ढवन,अरविंद मोहिते, राजेंद्र पाटील, राजेंद्र पाचे चंद्रकांत तागड, डॉ. अशोक भोजने, इंजिनिअर राजेंद्र तागड, डॉ. मीनाक्षी करडे आदीसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बलभीम पठारे म्हणाले की पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे विचार समाजाला प्रेरणादायी आहे, अहिल्यादेवी यांचा धर्मावर प्रचंड विश्वास होता म्हणून त्यांनी विविध धार्मिक पुस्तके व शास्त्रावर चर्चा घडवून आणली, ज्ञानसंपादन व संवर्धन याबाबत त्यांना मोठी आस्था होती, त्यांनी विविध मंदिरांची निर्मिती केली, तसेच बारव तलाव जतन करण्याचे काम केले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव आपल्या शहराला देण्याचा घेतलेला निर्णय कौतुकास्पद आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त नगर शहरातून भव्य पारंपारिक मिरवणूक काढण्यात आली यात नगरकरांनी उत्साहात सहभागी होत जल्लोषात जयंती साजरी केली असे ते म्हणाले.