अहमदनगर प्रतिनिधी – सक्षम ग्रामपंचायत व सन्मानित सरपंच यांसाठी कार्यरत असलेल्या सरपंच परिषद मुंबई,महाराष्ट्राच्या वतीने राज्यातील लोक प्रतिनिधी,अधिकारी,सरपंच, ग्रामसेवक, समाजसेवा करण्यासाठी पुरस्कार दिले जात आहेत.यात प्रामुख्याने ज्यांनी समाजहिताच्या प्रश्नावर काम केले आहे त्यांचा समावेश करण्यात आला आहे.
विधानसभा, विधान परिषदेत सरपंच आणि गावचे प्रश्न मांडून त्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्याचे काम ज्या लोक प्रतिनिधींनी केले ते म्हणजे माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण,माजी मंत्री आमदार सुरेश धस,आमदार प्रशांत बंब,आमदार निलेश लंके यांना हिवरे बाजार येथे येत्या २२ एप्रिल २०२२ रोजी होणाऱ्या कार्यक्रमात ‘स्वर्गीय यशवंतराव चव्हाण आदर्शलोक प्रतिनिधी पुरस्काराने’ सन्मानीत करण्यात येणार आहे.
प्रशासकीय सेवेत मोठ्या पदावर असतांना ज्यांनी पाणलोट क्षेत्र विकास,ग्रामीण भागात,कृषी क्षेत्रात उल्लेखनीय असे कार्य केले त्यात प्रामुख्याने कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त डॉ.विजय सुर्यवंशी, अंमल बजावणी संचलनालय मुंबई चे सहआयुक्त उज्वल चव्हाण,जे.डी.ए.कृषी विभाग पुणे चे रफिक नाईकवडी यांना ‘उत्तम प्रशासक म्हणून पुरस्कार’ प्रदान करण्यात येणार आहे.
याच बरोबर राज्यातील १० सरपंच यांना आदर्श सरपंच,पाच ग्रामपंचायतीना आदर्श ग्रामपंचायत,पाच ग्रामसेवकांना आदर्श ग्रामसेवक तसेच पाच समाजसेवा पुरस्कार देण्यात येणार आहेत,हे सर्व पुरस्कार विधान सभेचे अध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या शुभहस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत पोपटराव पवार यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होणार असल्याची माहिती आज अहमदनगर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली.
या पत्रकार परिषदेसाठी सरपंच परिषदेचे प्रदेश अध्यक्ष दत्ता काकडे,प्रदेश सरचिटणीस अँड.विकास जाधव,जिल्हाध्यक्ष आबासाहेब सोनवणे,अंजना येवले,ज्ञानेश्वर पठारे,नानासाहेब ठोंबरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.