पीएसआय नंदकुमार ठोंबरे यांनी घेतला सराईत अट्टल गुन्हेगारांचा ताबा.
अंमळनेर ( प्रतिनिधी )- पाटोदा तालुक्यातील अंमळनेर पोलिस ठाणे हद्दीतील गावात दिवसा घर फोड्या करुन नागरीकांना सळो कि पळो करुन सोडणाऱ्या अट्टल गुन्हेगार संदिप उर्फ संदिप्या ईश्वर भोसले वय २४ वर्षे रा.बेलगाव.कानडी.ता.कर्जत.जि.नगर
याला पारनेर जि.अहमदनगर पोलिसांच्या ताब्यातून कायदेशीर प्रक्रिया करुन गुरुवार तीस जुन रोजी रात्री बारा वाजता आष्टीचे उपविभागीय पोलिस अधिकारी अभिजित धाराशिवकर यांच्या मार्गदर्शनाखाली अंमळनेर पोलिस ठाण्याचे कर्तव्य दक्ष पोलिस उपनिरीक्षक नंदकुमार ठोंबरे यांनी ताब्यात घेतले आहे.
अंमळनेर पोलिस ठाणे हद्दीत अट्टल घरफोड्या करणारा संदिप उर्फ संदिप्या ईश्वर भोसले यांच्या घर फोडीच्या गुन्ह्यात एलसीबीने मुसक्या आवळल्या होत्या.त्यास 14 एप्रिल 2021 रोजी एलसीबीने अंमळनेर पोलिसांच्या ताब्यात दिले होते . संदिप उर्फ संदिप्या भोसले यास अंमळनेर पोलिसांनी सरकारी दवाखान्यात मेडिकल करण्यासाठी आल्यानंतर त्याने परत जातांना पोलीस ठाणे परिसरातुन अंधाराचा व पावसाचा फायदा घेत पोबारा केला होता.
अंमळनेर पोलिसांच्या ताब्यातून पोबारा केल्यानंतर देखील अट्टल गुन्हेगार संदिप ईश्वर भोसले याने तब्बल 39 गंभीर स्वरुपाचे गुन्हे केले .सर्वाधिक गुन्हे हे अंमळनेर,अंभोरा,आष्टी, पाटोदा,शिरुर पोलिस ठाणे हद्दीत केले असल्याची माहिती अंमळनेर पोलिस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षक नंदकुमार ठोंबरे यांनी दिली.
अंमळनेर पोलिस ठाणे हद्दीत जबरी गुन्हे करुन पसार झालेल्या संदिप उर्फ संदिप्या भोसले यास पारनेर पोलिसांकडून कायदेशीर प्रक्रिया करुन न्यायालयातुन कायदेशीर प्रक्रिया करुन भोसले यांचा ताबा अंमळनेर पोलिस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षक नंदकुमार ठोंबरे यांनी उपविभागीय पोलिस अधिकारी अभिजित धाराशिवकर यांच्या मार्गदर्शनाखाली घेतला असुन त्यास पारनेर पोलिसांकडून ताबा घेतांना अंमळनेर पोलिस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षक नंदकुमार ठोंबरे , पोलिस कर्मचारी प्रभाकर खोले, अनिल सुंबरे , योगेश बहिरवाळ,वाहन चालक हे होते.
फरार झाल्यानंतर ३९ गुन्हे केले ….
संदिप उर्फ संदिप्या भोसले हा अट्टल घरफोड्या करणारा सराईत गुन्हेगार असुन अंमळनेर पोलिसांच्या ताब्यातून पोबारा केल्यानंतर त्याने तब्बल ३९ गुन्हे केले असुन सर्वाधिक गुन्हे हे संदिप उर्फ संदिप्या भोसले याने अंमळनेर, अंभोरा,आष्टी,शिरुर, पाटोदा हद्दीत केले तर पुणे ,नगर , औरंगाबाद जिल्ह्यात त्याची मोठी दहशत निर्माण केल्याची माहिती देखील अंमळनेर पोलिस ठाण्याती पोलिस उपनिरीक्षक नंदकुमार ठोंबरे यांनी दिली.
अहमदनगर जिल्ह्यात मोक्का …
संदिप उर्फ संदिप्या भोसले हा सराईत अन् चपळ गुन्हेगार असुन त्याच्यावर मोक्का अंतर्गत गुन्हा पारनेर जि.अहमदनगर येथील पोलिस ठाण्यात दाखल असुन अंमळनेर पोलिस ठाण्यातुन पोबारा केल्याप्रकरणी त्याच्यावर अंमळनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असुन या प्रकरणाचा पुढील तपास हा उपविभागीय पोलिस अधिकारी अभिजित धाराशिवकर यांच्या मार्गदर्शनाखाली अंमळनेर पोलिस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षक नंदकुमार ठोंबरे हे करत आहेत.