विद्यार्थ्यांचे यश संस्थेच्या लौकिकात भर टाकणारे – दिलीप गुंदेचा
अहमदनगर प्रतिनिधी – गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वर्षावर मोठा परिणाम होत आहे.सततच्या बदलत्या नियमांमुळे शाळांचे कामकाजावर मर्यादा येत आहेत,त्यामुळे ऑनलाईन-ऑफलाईनच्या गोंधळात विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम होत आहे.
अशाही परिस्थिती शिशु संगोपन संस्थेच्या शाळा-महाविद्यालयातील शिक्षकांच्या अथक परिश्रमातून अभ्यासक्रम पूर्ण करुन घेण्यात येत आहे.त्याचबरोबर विद्यार्थ्यांना विविध स्पर्धांसाठी मार्गदर्शन करुन त्यात सहभागी करुन घेत आहेत.
विद्यार्थीही आपल्या मेहनतीने या परिक्षांमध्ये यश मिळवत आहेत,ही संस्थेच्या दृष्टीने अभिमानास्पद बाब आहे.शासकीय शिष्यवृत्तीत सविता रमेश फिरोदिया प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी मिळविलेले यश हे संस्थेच्या लौकिकात भर टाकणारे आहे,असे प्रतिपादन शिशु संगोपन संस्थेचे अध्यक्ष दिलीप गुंदेचा यांनी केले.
सविता रमेश फिरोदिया प्रशालेतील नऊ विद्यार्थी शिष्यवृत्ती परिक्षेत गुणवत्ता यादीत आल्याबद्दल शाळेच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष दिलीप गुंदेचा,उपाध्यक्ष दशरथ खोसे,सचिव र.धों.कासवा,सहसचिव राजेश झालानी,खजिनदार अॅड.विजयकुमार मुनोत,रश्मी येवलेकर,बन्सी नन्नवरे, मुख्याध्यापिका योगिता गांधी,प्राचार्या कांचन गावडे,विनोद कटारिया आदि उपस्थित होते.
इ.५ वीच्या शिष्यवृत्ती परिक्षेस १८ विद्यार्थी पात्र झाले असून,त्यामधील ९ विद्यार्थी शहरी विभाग गुणवत्ता यादीत आले आहेत.ती पुढीलप्रमाणे – कांचन नन्नवरे,साक्षी खताळ,तनिष्का सारसर, श्रृती शेळके,आयुष रोडे,साई गिते,अनुष्का दरेकर, स्वामी बडे,वैष्णवी कांबळे आदि.
याप्रसंगी योगिता गांधी म्हणाल्या,कोरोनाच्या सावटाखाली विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी शिक्षक शासनाच्या निर्देशानुसार ऑनलाईन तर कधी प्रत्यक्षांत मुलांचा अभ्यासक्रम पूर्ण करत आहे.त्याचबरोबर विविध स्पर्धांपरिक्षांना विद्यार्थ्यांना सहभागी करुन त्यातही यश मिळवत आहे.संस्था चालकांच्या सहकार्याने शाळेने यशाची परंपरा कायम ठेवली आहे.
यावेळी मार्गदर्शक शिक्षक श्रीराम खाडे,सौ.जगताप, सौ.लांडगे आदिंचे मान्यवरांनी अभिनंदन केले.यावेळी उपाध्यक्ष दशरथ खोसे,सचिव र.धों.कासवा, अॅड.विजयकुमार मुनोत आदिंसह पालकांनी मनोगत व्यक्त करुन शाळेचे कामाची प्रशांसा केली.सूत्रसंचालन जयश्री कोदे यांनी केले तर आभार ठकूबाई तरटे.
संस्थेचे विश्वस्त रमेश फिरोदिया,दिपक गांधी,संजय चोपडा,चं.सु.अनेचा,आर.एम.गुंदेचा,मनसुखलाल पिपाडा,अभय गुगळे,रमेश मुनोत, शिवनारायण वर्मा,राजेंद्र चोपडा,आदेश चंगेडिया,सुनिल गुगळे आदिंनी यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले.