साई नगर येथे अकोलकर क्रिएटीव्हीटी सेंटरचे उद्घाटन
अहमदनगर प्रतिनिधी – शहराला खूप मोठा सांस्कृतिक वारसा आहे. तो वाढविण्यासाठी अधिकाधिक प्रयत्न होणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे पुढील पिढीला तो हस्तांतरित करणे देखील महत्वाचे आहे असे प्रतिपादन डॉ नानासाहेब अकोलकर यांनी केले.बुरूडगाव रोड साई नगर येथे अकोलकर क्रिएटीव्हीटी सेंटरचे उद्घाटन करताना बोलत होते.यावेळी डॉ सुनिता अकोलकर, प्रा. विजय शिंदे उपस्थित होते.
या क्रिएटीव्हीटी सेंटरच्या माध्यमातून शास्त्रीय नृत्य भरत नाट्यम, शास्त्रीय गायन, तबला, हार्मोनियम, सिंथेसायझर शिकविले जाणार आहे. नृत्य व गायनाचे अभ्यासक्रम गांधर्व परीक्षा आणि संगीत विशारद यांच्या नियमाप्रमाणे शिकविले जाणार आहेत.आठवड्यातून प्रत्येकी दोन दिवस या अभ्यासक्रमाच्या बँच असणार आहेत.
डॉ अकोलकर पुढे म्हणाले कि यामुळे संगीत व गायन क्षेत्रासाठी काही योगदान देता येईल याचे समाधान वाटते.नवीन पिढी कलेच्या बाबतीत अधिकाधिक सक्षम होण्यासाठी प्रत्येकाने हातभार लावला पाहिजे जेणेकरून आजच्या तणावातून काही क्षण आनंदाचे मिळू शकतील.
या सेंटर च्या माध्यमातून भविष्यात चांगले संगीत शिक्षण मिळेल अशी आशा डॉ सुनिता अकोलकर यांनी व्यक्त केली.तबला शिकविण्यासाठी विश्वजित कुलकर्णी, हार्मोनियम व सिंथेसायझर शिकविण्यासाठी अजित गाडेकर व गायन शिकविण्यासाठी कु कोमल पाटील असणार आहेत.
अधिक माहिती साठी दुपारी ३ ते ७ यावेळेत सेंटर वर किंवा ९४०४७४४५०९ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आलेले आहे.