सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीने महात्मा फुले यांना जयंतीनिमित्त अभिवादन
समाजाच्या उध्दारासाठी बहुजनांच्या दारात शिक्षणाची गंगा आणण्याचे कार्य महात्मा फुले यांनी केले -विजय भालसिंग
अहमदनगर (प्रतिनिधी)- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त माळीवाडा येथील त्यांच्या पुतळ्यास सामाजिक कार्यकर्त्यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. विजय भालसिंग यांच्या हस्ते महात्मा यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी जालिंदर बोरुडे, देवीदास सुडके, चंद्रकांत बोरुडे, भिमाजी जाधव आदी उपस्थित होते.
विजय भालसिंग म्हणाले की, सर्व समाजाच्या उध्दारासाठी बहुजनांच्या दारात शिक्षणाची गंगा आणण्याचे कार्य महात्मा फुले यांनी केले. त्यांच्या दूरदृष्टीमुळे समाजाचा विकास साधला गेला व मानसिक गुलामगिरीतून मुक्तता मिळाली. क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना गुरुस्थानी माणून त्यांचा इतिहास जगा समोर आनला. महाराजांवर कुळवाडी भूषण पोवाडा त्यांनी लिहिला. तर पहिली शिवजयंती उत्सव साजरा करुन खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार प्रत्येकाच्या मना-मनात रुजण्याचे काम त्यांनी केले असल्याचे त्यांनी सांगितले.
भिमाजी जाधव यांनी आजही समाजात महापुरुषांच्या विचारांचा अंगीकार करुन त्यांचे विचार पुढे घेऊन जाण्याची गरज असल्याचे सांगितले. जालिंदर बोरुडे म्हणाले की, महापुरुषांचे विचार व कार्य सर्व समाजाला प्रेरणा देणारे आहे. शिक्षणाने संपूर्ण मानव जातीचा उद्धार होत असल्याचे महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या कार्यातून सिध्द झाले. त्यांनी अतोनात हाल अपेष्टा सहन करून शिक्षणाची मूहुर्तमेढ रोवली. त्यांच्या कार्याने समाज सावरला गेला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.