सारडा कॉलेज वस्तीगृहाच्या त्या जागेची विक्री, हस्तांतरण, भाडेपट्टा, देण्यास धर्मदाय उपायुक्त यांचा मनाई हुकूम जारी.
हिंद सेवा मंडळाचे सदस्य वसंत लोढा, दीप चव्हाण, संजय घुले, विधीतज्ञ अभिजीत पुप्पाल यांच्यामार्फत दाखल केलेला अर्ज मंजूर.
अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर शहरातील पत्रकार चौकातील सारडा महाविद्यालयाच्या मुलांच्या वस्तीगृहाच्या जागे संदर्भात घेतलेला पत्रकार परिषदेमध्ये वसंत लोढा दीप चव्हाण संजय घुले म्हणाले की सारडा कॉलेज वस्तीगृहाच्या त्या जागेची विक्री हस्तांतरण किंवा ही जागा कुणालाही भाडेपट्ट्याने देण्यास धर्मदाय उपायुक्तांनी मनाई हुकूम जारी केलेला आहे हिंद सेवा मंडळाचे सदस्य वसंत लोढा दीप चव्हाण संजय घुले यांनी अहमदनगरचे धर्मदाय उपायुक्त श्रीमती यु.एस.पाटील यांच्याकडे ज्येष्ठविधीतज्ञ अभिजीत पुप्पाल यांच्यामार्फत अर्ज करून या जागेचा विक्री व्यवहार करू नये यासाठी दावा दाखल केला होता. धर्मदाय उपायुक्त यांच्याकडे दाखल अर्ज क्रमांक १९५/२०२४ नुसार धर्मदाय उपायुक्तांनी अर्ज मंजूर करीत हा मनाई आदेश दिला आहे हिंदसेवा मंडळाच्या ताब्यात असलेली होस्टेल ओबेराय शेजारी असलेली सिटी सर्वे नंबर १६१/१ प्लॉट नंबर ४३अ. मधील तीन एकर २९ गुंठे जागा कवडीमोल भावाने विकण्याचा घाट घालण्यात आला होता.
स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी स्थानिक धनदांडग्या लँडमाफीयांना हाताशी धरून भाडेपट्ट्याने हिंदसेवा मंडळाच्या ताब्यात असलेली ही मोक्याची जागा कवडीमोल भावात खिशात घालून कोट्यवधी रुपये कमवायचा कट रचला होता. मंडळाने यासाठी सर्वकाही कायदेशीरपणे चाललेले आहे असे दाखवण्याचा साळसूतपणा करत ज्ञानदानाचे पवित्र कार्य करणाऱ्या या मंडळाच्या सदस्यांना खोट्याभुलथापा दिल्या मंडळांनी यासाठी २१ जानेवारी २०२४ रोजी खास सर्वसाधारण सभा आयोजित केली त्या अगोदर दिनांक ३ जानेवारी रोजी हिंदसेवा मंडळाच्या कार्यकारिणीची बैठक घेण्यात आली या जागेचा ताबा मंडळांनी सोडावा आणि बदल्यांमध्ये इमारत बांधून घ्यावी अश्या आशाच्या अरुण बलभीम जगताप व हर्षल संतोष भंडारी यांच्या अर्जाबाबत या बैठकामध्ये चर्चा झाली.
कार्यकारणीच्या बैठकीत हा अर्ज एकमताने मंजूर करण्यात आला सर्वसाधारण सभेत देखील याला मंजुरी देण्यात आली. याला ब्रिजलाल सारडा, मकरंद खेर, अनंत देसाई, मधुसूदन सारडा, विष्णू सारडा, श्यामसुंदर सारडा यांनी विरोध केला होता या विषयाला काही सदस्यांचा विरोध असताना हा विषय मंजूर करून कायदेशीर करण्याचा घाट घातला ही जागा सरकारी किंमत ३२ कोटी असताना ती २५ कोटी ला हस्तांतरित करण्याचा डाव टाकला या जागेवर जर बांधकाम झाले तर चालू बाजारभावाप्रमाणे याची किंमत ४०० कोटी रुपयांच्या घरात जाते ही जागा सय्यद हाजी हमीद तकिया ट्रस्ट बी-५० देवस्थानची इनाम वर्ग-३ ची असून ही मिळकत हिंदसेवा मंडळाच्या ताब्यात अवघ्यात ५०० रुपये प्रति वर्षाप्रमाणे आहे.
१९६४ सालापासून मंडळाकडे असलेल्या या जागेचा करार आणखी ४० वर्षे शिल्लक आहे. या जागेवर सारडा महाविद्यालयाचे विद्यार्थी वस्तीगृह होते मंडळाने या वस्तीगृहाची इमारत मोडकळीच आल्यानंतर त्याकडे सोईस्करपणे दुर्लक्ष केले आणि मोडकळीस आलेली इमारत पाडली आणि भूखंडाचे श्रीखंड करण्याचे कारस्थान मंडळाचे विश्वस्त अजित सिमरतमल बोरा यांनी रचले यासाठी मंडळाचे अध्यक्ष पदाधिकारी आणि कार्यकारणी सदस्य यांची मदत घेण्यात आली धर्मदाय आयुक्त व सय्यद हाजी हमीद तकिया ट्रस्ट बी ५० यांची परवानगी न घेता हा व्यवहार करण्यात आला ताबा सोडण्याच्या बदल्यात सारडा कॉलेजला २५ कोटी रुपयांची इमारत बांधून देण्याचे ठरले प्रत्यक्षात असे करता येते का? मंडळाला इतकी मोठी रक्कम वस्तू स्वरूपात जमिनीचा व्यवहार म्हणून घेता येते का? याची कोणतीही शहानिशा न करता बेकायदेशीरपणे सगळं मताने कटकारस्थान रुचून फसवणूक करण्याच्या दृष्ट हेतूने करण्यात आले या विरोधात वसंत लोड, दीप चव्हाण, संजय घुले हे उभे राहिले त्यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात फिरण्यात दिली याची दखल घेतली गेली नाही म्हणून त्यांनी धर्मदाय यू.एस.पाटील धर्मदाय उपायुक्त अहमदनगर यांच्याकडे तक्रारी केल्या तर त्यांना अब्रू नुकसानीचा दावा दाखल करण्याची नोटीस पाठवण्यात आली तरी देखील या कथित गैरव्यवहाराचा पडदा फास करण्याचा त्यांनी चंगबांधला आणि एका चांगल्या शिक्षण संस्थेची मोक्याची जागा कवडीमोल भावात जे लोकप्रतिनिधी आपल्या खिशात घालण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांना रोखण्याचा त्यांनी प्रयत्न केला आता आयुक्तांनी या व्यवहाराचा मनाई आदेश जारी केला आहे व पालक म्हणून मंडळाच्या विश्वस्त आणि सदस्यांना निर्देश दिले असल्याचे पत्रकार परिषदेमध्ये वसंत लोढा, दीप चव्हाण, संजय घुले यांनी सांगितले.