निमगाव वाघात धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयाचे शुभारंभ
अहमदनगर प्रतिनिधी – वाजिद शेख
निमगाव वाघा (ता. नगर) येथील धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयाचे शुभारंभ आमदार निलेश लंके यांच्या हस्ते वाचनालयाच्या फलकाचे अनावरण करुन करण्यात आले.नुकतेच झालेल्या कवी संमेलन व महिला बचत गट मेळाव्याप्रसंगी वाचनालयाचा शुभारंभ सोहळा पार पडला.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य माधवराव लामखडे, सिनेकलाकार राजू उर्फ मोहनीराज गटणे,प्रा.डॉ.शैलेंद्र भणगे,प्राचार्या गुंफाताई कोकाटे,माजी सरपंच साहेबराव बोडखे,मुख्याध्यापक किसन वाबळे,सरपंच रुपाली जाधव,उपसरपंच अलका गायकवाड,वाचनालयाचे अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य पै.नाना डोंगरे,महिला आर्थिक विकास महामंडळाचे सहाय्यक जिल्हा समन्वयक अधिकारी सुनिल पैठणे,गोकुळ जाधव, भागचंद जाधव,माजी सरपंच सुमन डोंगरे,भाऊसाहेब ठाणगे,ग्रामपंचायत सदस्या मुन्नाबी शेख,अरुण फलके, युवा मंडळाचे अध्यक्ष संदिप डोंगरे,शिवाजी होळकर, वनकुटेचे सरपंच राहुल झावरे,सचिव प्रतिभा डोंगरे, ग्रामपंचायत सदस्य किरण जाधव,प्रमोद जाधव, ज्ञानदेव कापसे,अतुल फलके,बापू फलके आदी उपस्थित होते.
आमदार निलेश लंके म्हणाले की, सुसंस्कारी पिढी घडविण्याचे कार्य धर्मवीर ग्रामीण वाचनालयाच्या माध्यमातून होणार आहे.ग्रामीण भागातील युवकांना वाचनाची आवड लागावी व स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करता यावा या उद्देशाने सुरु करण्यात आलेले वाचनालयाचा उपक्रम दिशादर्शक आहे. वाचनाने ज्ञान आत्मसात करुन,आपल्या वेगळेपणाचा ठसा उमटविता येणार असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
पै.नाना डोंगरे गावाच्या पंचक्रोशीत वाचनालय नसल्याने ग्रामीण भागातील युवकांना शहरातील वाचनालयांवर अवलंबून रहावे लागत होते. गावात अनेक विद्यार्थी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करीत असून, त्यांची सोय होण्यासाठी वाचनालय सुरु करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
माधवराव लामखडे यांनी वाचनालयास सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. मोहनीराज गटणे यांनी वाचनाने माणसामधील कलागुण बहरत असून, त्यांच्या सर्वांगीन विकासाला चालना मिळणार असल्याचे सांगितले.
यावेळी वाचनालयास लेखिका मनिषा गायकवाड, लेखक आनंद साळवे, मनिषा लहारे, मनोज शिंदे यांनी वाचनालयास पुस्तके भेट दिली.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भाऊसाहेब डोंगरे, अमोल डोंगरे, रमेश शिंदे, बाबासाहेब महापुरे, लक्ष्मण चौरे, किरण ठाणगे, विकास निकम, चंद्रकांत पवार, काशीनाथ पळसकर, वसंत कर्डिले, अमोल वाबळे, बाबासाहेब काळे यांनी परिश्रम घेतले.