अहमदनगर प्रतिनिधी –
समर्पित वृत्ती, रुग्णांसाठी उपलब्ध असणे आणि उच्चतम ध्येयवाद यांच्या समन्वयाने वैद्यकीय क्षेत्रात यश मिळवता येते हे डॉ. गोपाल बहुरूपी यांनी सिद्ध करून दाखवले आहे, असे प्रतिपादन स्नेहबंध फाउंडेशनचे अध्यक्ष उद्धव शिंदे यांनी केले.
‘नवभारत ग्रुप व आरोग्य मंत्रालय ,महाराष्ट्र राज्य’ यांच्या वतीने दिला जाणारा मानाचा ‘पश्चिम महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट डायबेटीज सेंटर’चा पुरस्कार न्यूक्लिअस हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटरला मिळाला. याबद्दल स्नेहबंध सोशल फाउंडेशन तर्फे डॉ.गोपाल बहुरूपी यांचा सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी निरज गुगळे, आकाश निऱ्हाळी उपस्थित होते.
शिंदे म्हणाले, कोरोनासारख्या कठीण काळात आपला जीव धोक्यात घालून रुग्णांना आरोग्य सेवा पुरवणाऱ्या डॉक्टरांचे कार्य कौतुकास्पद आहे. भीतीच्या वातावरणात आपल्या जीवापेक्षा रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा म्हणून गोरगरिबांची सेवा केली, अशा डॉक्टरांचे कार्य मोठे आहे.