स्व.शंकरराव घुले यांच्या स्मृतीदिनानिमित्त अभिवादन
स्व.शंकरराव घुले यांच्या लढ्यामुळे कष्टकर्यांचे जीवनमान उंचावले – कॉ.बाबा आरगडे
नगर – कष्टकरी हा समाजाचा कणा आहे आणि तो मजबूत राहिला पाहिजे. यासाठी स्व.शंकरराव घुले यांनी मोठं,मोठं आंदोलने उभे केले. हमाल पंचायतच्या माध्यमातून हमालांच्या पाठीवरचे ओझे कमी करुन खर्या अर्थाने त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. माथाडी कामगारांना त्यांचे हक्क मिळवून दिले. बाजार समितीच्या हमाल-मापाड्यांच्या प्रश्नांसाठी सरकार विरोधात आंदोलन उभे करुन अनेक प्रश्न मार्गी लावले. त्यांनी कष्टकर्यांसाठी उभारलेल्या लढ्याला राज्यभरातून समर्थन मिळाले. त्यांचा लाभ राज्यातील कष्टकर्यांनाही झाला. त्याचप्रमाणे नगराध्यक्ष, विविध संस्थांचे पदाधिकारी म्हणून त्यांनी आपल्या कार्याने एक वेगळी ओळख निर्माण केली. त्यांचे कार्य आजही सर्वांसाठी दिशादर्शक असेच आहे, असे प्रतिपादन कॉ.बाबा आरगडे यांनी केले.
कष्टकर्यांचे नेते स्व.शंकरराव घुले यांच्या स्मृतीदिनानिमित्त मार्केट यार्ड, हमाल पंचायत येथील त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी हमाल पंचायतचे जिल्हाध्यक्ष अविनाश घुले, कॉ.बाबा आरगडे, उपाध्यक्ष गोविंद सांगळे, शेख रज्जाक शेख लाल, सुभाष तळेकर, सचिव मधुकर केकाण, सल्लागार अशोक बाबर, ज्ञानदेव पांडूळे, रविंद्र भोसले, जालिंदर बोरुडे, डॉ.विजय कवळे, लतिफ शेख, रत्नाबाई आजबे, मंदाबाई सूर्यवंशी, लक्ष्मण वायभासे, भगवान सांगळे, भिमराज कांडेकर, संजय वाल्हेकर, गणेश भगत, हरिश्चंद्र गिरमे, विलास कराळे, तारकराम झावरे, सदानंद सोनवणे, अशोक आगरकर, नंदू डहाणे, मच्छिंद्र मालूंजकर, आनंदा शिंदे, आदिनाथ गिरमे, प्रा.सुनिल गोसावी, अजय चितळे, दत्ता वामन, युवराज राऊत, तबाजी कार्ले, बाळकृष्ण पठारे, मंगल भुसाळे, अर्जुन शिंदे, संजय महापुरे, रावसाहेब सांगळे, विशाल साळवे, विश्वनाथ घालमे, गोरख खांदवे, दिलीप गायकवाड, लक्ष्मण ढगे, गणेश आटोळे, रावसाहेब सांगळे, राजू चोरमले, अनुरथ कदम, बहिरु कोतकर, रामा पानसंबळ, नवनाथ बडे, लक्ष्मण वायभासे, गणेश बोरुडे, सुनिल गर्जे, राहुल घोडेस्वार, बाबासाहेब गिते, अशोक टिमकरे, शेख उबेद अब्दुल गनी, महादेव गर्जे, विलास बनसोडे आदि उपस्थित होते.
याप्रसंगी अविनाश घुले म्हणाले, कष्टकरी आणि शंकरराव घुले यांचे अतुट नाते होते. कष्टकर्यांचे जीवनमान उंचविण्यासाठी विविध पातळ्यांवर त्यांनी प्रयत्न केले. त्यांच्या हक्कांसाठी जनआंदोलन उभे करुन विकास साधण्यात आला आहे. कष्टकर्यांच्या आरोग्य सेवेसाठी हॉस्पिटल, आर्थिक पत निर्माण होण्यासाठी पतसंस्था, गुणवंत कामगार व त्यांचे पाल्य यांचा सन्मान केला. कष्टकर्यांना स्वत:ची पत निर्माण करण्यात त्यांचा मोलाचा वाटा राहिला आहे. त्यांचे विचार आणि कार्य आपण हमाल पंचायतीच्या माध्यमातून पुढे नेत असल्याचे सांगितले.
याप्रसंगी सुभाष तळेकर म्हणाले, प्रत्येकाला आपल्या हक्कासाठी संघटन हे महत्वाचे असते. संघटनेच्या माध्यमातून दिलेल्या लढ्याला यश नक्कीच मिळत असते. स्व.शंकरराव घुले यांनी कष्टकर्यांचे मोठे संघटन उभे केले त्यामुळेच त्यांना त्यांचे हक्क मिळाले. त्यांच्यासारख्या नेतृत्वामुळे सरकारला कष्टकर्यांसाठी निर्णय घेणे भाग पाडले. त्यांचे हेच संघटन आजही कायम असून, त्या माध्यमातून कष्टकरी, कामगार आपले हक्क मिळवत आहेत, ही त्यांच्या कार्याची ओळख कायम राहील, असे सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय महापुरे यांनी केले तर आभार मधुकर केकाण यांनी मानले. यावेळी अनेकांनी स्व.शंकरराव घुले यांच्या आठवणींना उजाळा दिला.