हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने भिंगारला महात्मा गांधीजी जयंती स्वच्छता अभियानाने साजरी

- Advertisement -

लावण्यात आलेल्या झाडांना ट्री गार्ड बसवून वृक्ष संवर्धनाचा संदेश

निरोगी व सदृढ आरोग्यासाठी स्वच्छता व पर्यावरण संवर्धन काळाची गरज – संजय सपकाळ

 

अहमदनगर प्रतिनिधी – वाजिद शेख

वर्षभर नागरिकांच्या सदृढ आरोग्यासाठी योग, प्राणायामासह सामाजिक उपक्रम राबविणार्‍या हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने भिंगार येथील भगवान गौतम बुध्द जॉगिंग पार्क मध्ये महात्मा गांधीजी यांची जयंती स्वच्छता अभियानाने साजरी करण्यात आली. तर जॉगिंग पार्कच्या परिसरात लावण्यात आलेल्या झाडांना ट्री गार्ड बसवून त्यांचे सवर्धन करण्यात आले. या उपक्रमाद्वारे निरोगी व सदृढ आरोग्यासाठी सार्वजनिक स्वच्छतेचा संदेश देत, पर्यावरणाचे महत्त्व विशद करण्यात आले.

प्रारंभी महात्मा गांधीजी यांना अभिवादन करुन स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. ग्रुपच्या सदस्यांनी भगवान गौतम बुध्द जॉगिंग पार्क मध्ये व परिसरात साचलेला कचरा उचलला.

यावेळी ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संजय सपकाळ, रमेश वराडे, दिपक बडदे, सर्वेश सपकाळ, सीए रविंद्र कटारिया, किशोर बोरा, अशोक लोंढे, मेजर दिलीप ठोकळ, दिलीप गुगळे, सुधाकर चिदंबर, दिलीप बोंदर्डे, सिताराम परदेशी, अजय खंडागळे, विकास निमसे, सुमेश केदारे, विकास भिंगारदिवे, सुनिता वराडे, विद्या जोशी, प्रांजली सपकाळ, अनिता सोनवणे, आरती बोर्‍हाडे, लक्ष्मी गायकवाड, सुरेखा आमले, अभिजीत सपकाळ, किरण फुलारी, राजू कांबळे, सुर्यकांत कटोरे, भारत दहिफळे, नामदेव जावळे, मनोहर पाडळे, भास्कर भालेराव, आब्बास शेख, विनोद खोत, देवीदास गंडाळ, प्रफुल्ल मुळे, रमेश त्रिमुखे, राहुल थोरात, संदिप सोनवणे, राजू शेख, संतोष हजारे, दिपक टाक, सत्यजीत कस्तुरे, आसाराम बनसोडे, सरदारसिंग परदेशी, रमेश कोठारी, संकेत शेलुकर आदिंसह ग्रुपचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संजय सपकाळ म्हणाले की, निरोगी व सदृढ आरोग्यासाठी स्वच्छता व पर्यावरण संवर्धन काळाची गरज बनली आहे. स्वतःच्या वैयक्तिक स्वच्छतेसह आपला घर, परिसर, सार्वजनिक जागा स्वच्छ ठेवल्यास निरोगी व सुदृढ जीवन जगता येणार आहे. तर पर्यावरणावर मनुष्याचे जीवन अवलंबुन असून, पर्यावरण संवर्धनासाठी झाडे लाऊन ती जगवली गेली पाहिजे. ही मोहिम एका दिवसापुरती मर्यादीत न ठेवता हरदिन मॉर्निंग ग्रुपचे सदस्य वर्षभर योगदान देत असतात. त्याचबरोबर सामाजिक उपक्रम देखील राबविले जात असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी स्वप्निल सातकर, सुरेश केदारे, श्रीरंग देवकुळे, सुरेंद्रसिंह सोहेल, अशोक भुजबळ, हरिश साळुंके, जालिंदर बोरुडे, सचिन पेंढूरकर, रामनाथ गर्जे, सुधीर दहीफळे, प्रफुल्ल मुळे, सलाबत खान, सचिन चोपडा, राहुल दिवटे, शिवाजी कदम, प्रशांत मुथा, जालिंदर बेल्हेकर, प्रकाश देवळालीकर, प्रविण परदेशी, अविनाश जाधव, एकनाथ जगताप, अरुण कडूस, सुनिल शिंदे, सचिन थोरात, संदीप छजलानी, सुयोग चंगेडीया, राजेंद्र पांढरे, बाळासाहेब बेरड, बापू तांबे, दिनकर धाडगे, विलास दळवी, सुहास देवराईकर, भास्कर भालेराव, अनंत सदलापूरकर, विशाल भामरे, जालिंदर बोंदर्डे, अमोल धाडगे, किशोर सोमाणी, सुनिल फळे, माधव भांबुरकर, जालिंदर बेरड, संपत बेरड यांनी परिश्रम घेतले.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles