2 वेळी सापडलेले 44 कर्मचाऱ्यांना आयुक्तांनी दिली शेवटची तांबी
दिनांक 11 तारखेच्या कारवाईनंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा तपासणी केली असता 44 कर्मचारी हे मुख्यालयात उशिरा आणि आल्याचे निदर्शनास आले अशा सर्व कर्मचाऱ्यांना आयुक्त साहेब यांनी समक्ष बोलावून पुन्हा विलंब झाल्यास निलंबनाची कारवाई करण्यात येईल अशी तंबी दिली, कर्मचाऱ्यांनी देखील त्यांचे माफीनामे आयुक्त साहेब यांना सादर केले आहेत. आयुक्त यांच्या अशा कारवाईमुळे मुख्यालयातील कर्मचारी रोज गणवेश परिधान करून,थम इम्प्रेशनच्या मशीनला रांगा लावून थम करीत आहेत.
तसेच आज कचरा संकलनाचे ठेकेदार यांनी बील अदा न केल्यामुळे शहरातील संकलनाचे कामकाज बंद केले त्यामुळे शहरात कचरा वाढला आहे, सदर बाब निदर्शनास आल्यानंतर आयुक्त साहेब यांनी तात्काळ घनकचरा विभागाचे उपायुक्त ,विभाग प्रमुख, सर्व स्वच्छता निरीक्षक यांची तातडीने बैठक घेऊन महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांमार्फत कचरा संकलनाचे कामकाज चालू करण्याचे निर्देश दिलेत. पावसाळ्यामध्ये कुठेही पाणी साचून नागरिकांची अडचण, खोळंबा होणार नाही. शहरातून जाणाऱ्या दिंडी मार्गाच्या स्वच्छता पिण्याच्या पाण्याची उपलब्धता मुक्कामाच्या ठिकाणी ची सोय याबाबत व्यवस्था करण्याचे निर्देश दिले, कचरा संकलनाचे कामकाज बंद केलेल्या ठेकेदार यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याच्या सूचना संबंधित उपायुक्त यांना देण्यात आले आहेत.