श्रीमंत पवार सरकार संस्थानचे सोमेश्वर महादेव मंदिर जिर्णोद्धार शुभारंभ…
प.पु.महंत अरविंदजी महाराज,प.पु.राघवेश्वरानंदजी महाराज यांचे प्रमुख उपस्थितीत व शुभहस्ते संपन्न…
कोपरगाव प्रतिनिधी – शहरातील वेशी समोर सराफ बाजार येथे असलेले श्रीमंत पवार सरकार संस्थानचे सोमेश्वर महादेव देवस्थान मंदिर जिर्णोद्धार शुभारंभ व विधीवत पूजन करण्यात आले.
सूर्योदयापासून पारंपरिक सनईच्या स्वराने सोमेश्वर महादेव शिवलिंगावर काशी(गंगोत्री),गोदावरी जलाभिषेक,पुजन व होमहवनाने सोमेश्वर महादेवाच्या उपासनेला सुरुवात करण्यात आली.ज्येष्ठ व्यापारी व शिवभक्त श्री.नारायणशेठ अग्रवाल व सौ.सुषमाताई नारायणशेठ अग्रवाल,संत ज्ञानेश्वर स्कूलचे संचालक श्री.विशालजी झावरे व सौ.वसुधाताई विशालजी झावरे यांना पूजेचे यजमान होते.याप्रसंगी श्रीमंत पवार सरकार संस्थानचे जनरल मुखत्यार श्री.महेंद्रजी (पाटील) पाटील व सौ.संगीताताई महेंद्रजी पाटील,माजी नगराध्यक्ष व वास्तू रचनाकार श्री.मंगेशजी पाटील, स्थापत्य अभियंता श्री.चंद्रकांतजी कौले साहेब, प्रसिद्ध व्यापारी श्री.महावीरशेठ शिंगी,गंगेश्वर महादेव (श्रीमंत पवार सरकार संस्थान, जेऊर कुंभारी)चे व्यवस्थापक श्री.पाटीलबा वक्ते, ग्रामदैवत श्री गोकर्ण गणेश भक्त मंडळाचे श्री.संदिपजी जोशी,पुरोहित श्री.प्रविणशास्री मुळे,श्री.निलेशजी जोशी,गुरव श्री.नंदुजी शेंडे,मुंबादेवी मंडळ व साईगांव पालखीचे प्रमुख श्री.सुनीलजी फंड,सोमेश्वर महादेव भक्त परिवाराचे श्री.मनोजजी कपोते, श्री.महावीरजी शिंगी,श्री.निलेशजी उदावंत,श्री.जयंतजी पाटील,श्री.मनोजजी शिंदे, सौ.सुमनताई शिंदे,सौ.सुमन देवळानिकर,सौ.मयुरीताई संतोषजी डागा,सौ.कावेरीताई मनोज कपोते,श्रीमती कांताबाई शेंडे,श्री.संदिपजी देवळालिकर ,श्री.अक्षयजी काळे यांचे सह भक्त परिवाराचे सदस्य उपस्थित होते.
याप्रसंगी उपस्थित प.पु.महंत अरविंदजी महाराज यांनी सोमेश्वर महादेव मंदिर जिर्णोद्धारात शिवभक्तांनी पुढे येवून सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
श्री क्षेत्र राघवेश्वर महादेव देवस्थानचे महंत प.पु.राघवेश्वरानंदजी महाराज म्हणाले,अतिप्राचीन महत्व असलेल्या आणि साधू,संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या कोपरगाव भूमीवर श्रीमंत पवार सरकार कालीन मंदिराचा जीर्णोद्धार भक्तांकडून होत आहे. नव्याने मंदिर उभारणी पेक्षा एखाद्या ऐतिहासिक मंदिराचा शास्त्रोक्त जिर्णोद्धार होणे म्हणजे नवीन बारा मंदिर उभारणीचे पुण्य मिळते.असे संत जनार्दन स्वामी नेहमी सांगत होते.भारतीय संस्कृती आणि परंपरा जोपासणारे राजे-महाराजे आणि त्यांचे मावळे यांनी बलिदान देत आपली देवालय आणि संस्कृती रुजवली आहे.ईतिहासाची उजळणी करतांना त्यांनी उभारलेले देवालय टिकवण्याची आणि जिर्णोद्धाराचे काम ईश्वरीय असल्याचे सांगितले.
उपस्थितांचे स्वागत व संचलन श्रीमंत पवार सरकार महादेव देवस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुशांत घोडके यांनी केले.
सोमेश्वर महादेव देवस्थान जिर्णोद्धार आराखडा,कामकाज नियम व नियोजन लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचे श्रीमंत पवार सरकार संस्थानचे महादेव देवस्थान व्यवस्थापन वतीने कळवले आहे.