अहमदनगर (प्रतिनिधी)- फेज टू नवीन पाईप लाईन वरून नळ कनेक्शन देताना अधिकृत जुने नळ कनेक्शन धारकांना शुल्क न आकारता नल कनेक्शन देण्याच्या मागणीसाठी सर्वसाधारण सभेमध्ये नगरसेवक आसिफ सुलतान यांनी महापौर रोहिणीताई शेंडगे, उपमहापौर गणेश भोसले व मनपा आयुक्त शंकर गोरे यांना या मागणीचे निवेदन देण्यात आले.
अहमदनगर शहरात महापालिका हद्दीत पाणी प्रश्न गंभीर बनला आहे अमृत योजना व फेज टू योजनेचे काम प्रगतीपथावर असून लवकरात लवकर शहराच्या पाण्याचा जिव्हाळ्याचा प्रश्न सुटेल अशी अपेक्षा नागरीक करीत आहे . अहमदनगर महानगरपालिका प्रशासनाने १६ जुलै रोजी प्रसिद्धीपत्रक जाहीर केले आहे.त्यामध्ये मनपा हद्दीतील सर्व नागरिकांना नळकनेक्शन धारकांना अनधिकृत नळ कनेक्शन नियमित करून घ्यावे व त्यासाठी कालावधी निश्चित करण्यात आला आहे तसेच आकारणी शुल्क दंड भरून नळकनेक्शन नियमित करण्याबाबत सूचित केले आहे व निर्धारित वेळेत जर अनधिकृत नळ कनेक्शन नियमित केलेले नाही तर थेट दंड व फौजदारी कारवाई करणार असल्याचे म्हटले आहे हे निश्चितच शहराच्या दृष्टीने स्वागतार्ह आहे परंतु काही भागा मध्ये विकास कामे रस्ते, ड्रेनेजची कामे करताना नवीन फेज टू लाईन वरून स्वतः नळ कनेक्शन घेणे बाबत नागरिकांना सांगण्यात आले होते व नागरिकांची घेतलेले आहे कारण रस्ते झाल्यावर नळ कनेक्शन साठी परत खोदकाम केल्यास रस्ते खराब झाले असते प्रशासनाच्या सूचना वरूनच संपूर्ण शहरांमध्ये बऱ्याच ठिकाणी काळाची गरज पाहता नवीन लाईन वरून नळकनेक्शन घेण्यात आले आहे त्यामध्ये अधिकृत तसेच अनधिकृत कनेक्शन घेतले गेल्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे ज्या मालमत्ता धारकाची व नळ कनेक्शन धारकाची रीतसर नोंद महापालिकेत आहे व ज्यांनी पूर्वी कनेक्शन घेताना पालिकेची पूर्ण शुल्क भरलेले आहे असे नळ कनेक्शन धारकांना आपण अनाधिकृत ठरवू शकत नाही कारण प्रशासनाच्या सूचनेवरून त्यांनी नळकनेक्शन स्वखर्चाने घेतलेले आहे जेणेकरून रस्ता परत खोदला जाऊ नये व रस्त्याची दुर्दशा होऊ नये यासाठी नळ कनेक्शन घेण्यात आलेले आहे व जे अधिकृत नळ कनेक्शन धारक आहे व ज्यांनी स्वखर्चाने नळ कनेक्शन घेतलेले आहे त्यांच्याकडून कोणतेही शुल्क व दंड आकारू नये तसेच अनधिकृत नळ कनेक्शन बाबत शोध मोहीम राबवून कारवाई करण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. त्यावर महापौर व आयुक्त साहेबां नी संबधित अधिकाऱ्यांना योग्य कार्यवाही करण्याचे आदेश दिले.