कर्जत प्रतिनिधी – गणेश जेवरे
काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची राज्यातील नेते उधारी व उसनवारीवर भाजपमध्ये घेऊन मी पुन्हा येईल मी पुन्हा येईल असे म्हणून १२६ जागांवरून १०३ जागांवर मजल मारणाऱ्या भारतीय जनता पक्षाचा खरा चेहरा जनतेसमोर पक्ष कार्यकर्त्यांनी उघडा पाडावा असे आवाहन काँग्रेस पक्षाचे निरीक्षक गोपाल तिवारी यांनी कर्जत येथे बोलताना केले.
कर्जत येथे काँग्रेस पक्षाच्या वतीने आज पक्षाच्या डिजिटल सभासद नोंदणी अभियान कार्यक्रमांतर्गत बैठक घेण्यात आली.यावेळी पक्षाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके, ज्येष्ठ नेते ज्ञानदेव वाफारे, जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण घुले व कैलास शेवाळे, तालुकाध्यक्ष किरण पाटील, ज्येष्ठ नेते तात्यासाहेब ढेरे, युवक अध्यक्ष सचिन घुले ,मिलिंद बागल ,ओंकार तो, किशोर तापकीर, मुबारक भाई मोगल, श्री चव्हाण यांच्यासह मोठ्या संख्येने तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना श्री तिवारी पुढे म्हणाले की, देशातील जनतेला खोटी आश्वासने देऊन नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले आहेत.मिस कॉल देऊन त्यांनी देशातील अनेकांना भाजपची सभासद केले. पक्षाची सभासद झाल्यामुळे त्या प्रामाणिक नागरिकांची भावना पक्षाची बांधिलकी ठेवण्याची झाली आणि या मानसिकतेचा फायदा घेत त्यांनी केंद्र सरकारच्या अनेक चुकांकडे दुर्लक्ष केले.
पेट्रोलचा भाव ११० कॉलर असताना देखील देशात पेट्रोल आणि डिझेल कांग्रेस राजवटीमध्ये ५० ते ६० रुपयांनी विकले गेले.गॅस सिलेंडरची किंमत ३०० ते ४०० रुपये होती.आज १००० रुपयांच्या किमतीला गॅस सिलेंडर विकले जात सर्वत्र प्रचंड महागाई वाढली आहे आणि कुठे नेऊन ठेवलाय भारत माझा अशी म्हणण्याची वेळ जनतेवर आली आहे.हे सर्व केवळ उद्योगपतींचे कर्ज माफ करण्यासाठी केंद्र सरकार करत आहे असा आरोप श्री तिवारी यांनी यावेळी केला.
राज्यांमध्ये भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी महा विकास आघाडीची सत्ता आणली आहे.राज्यातील तिन्ही पक्षी अतिशय चांगल्या पद्धतीने काम करत आहेत. महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाचा विरोधी पक्ष नेता देखील भाजपने पळवला अशाही परिस्थितीमध्ये महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी राज्यातील सर्व काँग्रेस पक्षाच्या नेत्यांना एकत्र करून काँग्रेस पक्षाची संख्याबळ विधानसभेमध्ये वाढवले.आगामी काळामध्ये पक्ष कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारच्या विरोधात जनतेमध्ये जनजागृती करावी यासाठी जास्तीत जास्त डिजिटल सभासद नोंदणी अभियान घरोघरी जाऊन राबवावी असे आवाहन गोपाल तिवारी यांनी केले.
यावेळी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंखे, ज्ञानदेव वाफारे,जिल्हा उपाध्यक्ष कैलास शेवाळे, जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण घुले, तालुकाध्यक्ष किरण पाटील, व तात्या ढेरे यांची भाषणे झाली.