आष्टी प्रतिनिधी – सुरुडी (ता.आष्टी) गावाला वीज पुरवठा करणारा ट्रांसफार्मर (डेपी) नादुरुस्त झाल्याने गेल्या १५ दिवसांपासून संपूर्ण गावाचा वीज पुरवठा खंडित झाला होता. या खंडित वीज पुरवठ्यामुळे गावकऱ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले.
त्यातली त्यात १० वी आणि १२ वी च्या सध्या परीक्षा सुरू आहेत.विद्यार्थ्यांना देखील या समस्यांला तोंड द्यावे लागत होते. दुरुस्ती बाबत नागरिकांकडून वारंवार पाठपुरावा केला जात असताना विविध कारणे सांगत वीज वितरण कार्यालय दुरुस्तीकडे दुर्लक्ष करीत असल्याचे लक्षात आले.
परंतु MEDIA DAILY NEWS च्या बातमीची दखल घेत १५ दिवसांपासून अंधारात असलेल्या गावाचे ट्रान्सफार्मर (डीपी) ही पहाडी राजा,समाजसेवक शिवाजी नाकाडे यांनी केलेल्या पाठपुराव्याने सुरुडी गावाला एका दिवसात डीपी मिळवून दिली. असे समाजसेवक प्रत्येक गावा – गावात असावेत असे गावातील काही नागरिकांकडून बोलले जात आहे.तसेच यांच्या बरोबर सुरुडी गावातील काही नागरिकांनी देखील यासाठी अथक परिश्रम घेतले.
ट्रासफार्मर (डीपी) आणण्यासाठी ज्या ज्या व्यक्तींनी कष्ट घेतले त्यांचे MEDIA DAILY NEWS कडून मनःपूर्वक आभार….