वाडिया पार्क जलतरण तलावाच्या सुरक्षेबाबत संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन देऊन देखील त्या निवेदनाला केराची टोपली
जलतरण तलावात मृत्यूस जबाबदार म्हणून जिल्हा क्रीडा अधिकारी व संबंधित ठेकेदार यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी
माजी सैनिक संघटना व सामाजिक कार्यकर्ते मतीन सय्यद यांची पोलीस अधीक्षकांकडे धाव
अहमदनगर (प्रतिनिधी) – सामाजिक कार्यकर्ते सय्यद मतीन ख्वाजा यांनी २४ मे २०२४ रोजी सदरील वाडियापार्क येथील जलतरण तलाव येथे भेट दिली असता त्यावेळेस तेथे सुरक्षारक्षक दिसून आले नाही. व वॉचमन आणि इतर मुले दिसली त्यांना योग्य ते ट्रेनिंग देण्यात आलेले नव्हते तसेच त्यांना कुठल्याही प्रकारचा जलतरण तलावाचा ज्ञान नव्हता त्यामुळे आम्ही २४ मे २०२४ रोजी सदरील घटनेचे गांभीरपणे विचार करून जिल्हाधिकारी व जिल्हा क्रीडा अधिकारी यांना निवेदनाद्वारे सूचित केले होते.
वाडिया पार्क जलतरण तलावामध्ये कुठलीही सुरक्षारक्षक नसल्याने जीवित हानीची मोठी घटना होऊ शकते अशी तक्रार केलीअसता सरोसपणे नियमाचे उल्लंघन होत असून ट्रेनिंग सुरक्षा गार्ड नाही. अशा वेळेस लहान मुलांपासून वृद्धापर्यंत पोहण्यासाठी व शिकण्यासाठी लोक येतात त्यांना (सर्टिफाइड लाईफ गार्ड ट्रेनर) तांत्रिक मनुष्यबळ नियमानुसार नेमण्यात यावे असे निवेदन दिले होते परंतु २ जून २०२४ रोजी सकाळी वाडिया पार्क जलतरण तलाव येथे सागर कळसकर नावाचे व्यक्तीचे व्यक्तीचे पोहताना मृत्यू झाला ही बाब कळाली असता जिल्हा क्रीडा अधिकारी व ठेकेदार यांच्या गैरप्रकाराचे व जलतरण तलावामध्ये गांभीर्याने लक्षण न देण्याकारणामुळे झालेला आहे.
आम्ही अगोदर दिलेल्या अर्जाचा जिल्हा क्रीडा अधिकारी व ठेकेदार यांनी दिलेल्या निवेदनाची दखल न घेतली व जलतरण मध्ये कोणत्याही प्रकारचे लक्ष न दिल्याने व त्यांनी जाणून बुजून कामात कसूर केल्याने निष्काळजी पणामुळे सदरचे प्रकार घटना घडलेली आहे. त्यामुळे जिल्हा क्रीडा अधिकारी व ठेकेदार यांच्यावर सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करण्यात यावा व त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याच्या मागणीसाठी जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन देण्यात आले यावेळी सामाजिक कार्यकर्ते सय्यद मतीन ख्वाजा समवेत राष्ट्रवादी अल्पसंख्यांक विभागाचे जिल्हा अध्यक्ष अथर खान, माजी सैनिक संघटनेचे कार्याध्यक्ष नवनाथ मोहिते, बेलदार समाजाचे जिल्हा अध्यक्ष रघुनाथ मोहिते आदी उपस्थित होते.
या निवेदनाची दखल घेतलीगेली नाही तर त्रिदल माजी सैनिक संघटनेच्या वतीने मोठ्या प्रमाणात आंदोलन छेडण्यात येणार असल्याचा इशारा देखील देण्यात आला आहे.