अहमदनगर (प्रतिनिधी)- न्यू इंग्लिश स्कुल हंगे (ता. पारनेर) मधील एन.एम.एम.एस. स्कॉलरशिप परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव राज्यमंत्री आदिती तटकरे यांचे हस्ते करण्यात आला.
पारनेर तालुक्यात रयत शिक्षण संस्थेच्या बारा विद्यालये असून त्यात हंगे या विद्यालयातील तीन विद्यार्थी स्कॉलरशिप ला पात्र ठरले आहेत. विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आपल्या गुणवत्तेची चमक दाखवली आहे. या परीक्षेतील गुणवंत विद्यार्थी ऋषिकेश बाळासाहेब दळवी, प्रथमेश नितीन नगरे, ऋतुजा राजेंद्र शिंदे यांचा राज्यमंत्री तटकरे यांच्या हस्ते नुकताच गौरव करण्यात आला. आमदार निलेश लंके यांनी गुणवंत विद्यार्थी व मार्गदर्शक अध्यापकांचे कौतुक करुन अभिनंदन केले.
यावेळी मुख्याध्यापक अनुसंगम शिंदे, विभाग प्रमुख भारती म्हस्के, राजेंद्र टापरे, अनिल खांदवे, सुवर्णा भोर उपस्थित होते.