कल्याण रोड परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ
नागरिक दहशतीच्या वातावरणात; कोतवाली पोलिसांचे दुर्लक्ष
कल्याण रोड परिसरात गस्त वाढवा परिसरातील नागरिकांची निवेदनाद्वारे मागणी
अहमदनगर प्रतिनिधी – कल्याण रोड परिसरामध्ये अनुसयानगर आनंदपार्क,विद्या कॉलनी,समता नगर,आदर्श नगर परिसरात दि.२६ ऑगस्ट पासून दररोज मध्यरात्री चोरटे हात मध्ये हत्यारे घेऊन नागरिकानं मध्ये दहशत निर्माण करत आहे. त्यामुळे नागरिकांनमध्ये भीतीचे वातावरण पसले आहे.राजरोसपणे घराचे दारे-खिडक्या तोडून घरात घुसून हत्याराचा धाक दाखवून खुलेआमपणे चोऱ्या करत आहे. या सर्व घटनेने कल्याण रोडकर त्रस्त झाले आहे.या भागामध्ये कोतवाली पोलिसांकडून कुठल्याही प्रकारे गस्त घातली जात नाही त्यामुळे चोरीच्या घटना वारंवार घडत आहे.तरी पोलिसांनी आपली भूमिका चोखपणे बजावून या चोरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर यांच्याकडे निवेदनाद्वारे स्थानिक नागरिकांनी केली आहे
यावेळी ॲड.युवराज शिंदे,धनंजय सातपुते,अजय वाडेकर,वैष्णव मुडलीक,रवी मैड,रोहित काळोखे,विजय बुगे,सचिन भागवत,नासिर मणियार, विवेक विधाते,गणेश सुंबे,चंदन बारसे आदी उपस्थित होते.